…म्हणून राहुल गांधींना राजकीय कारकिर्दीत अपयश : रामदेव बाबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 21 जूनला जगभरात विश्व योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. याच निमित्त योग गुरु बाबा रामदेव महाराष्ट्रमध्ये असणार आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर नांदेड येथे योग करणार आहेत.

योग दिवसाआधी रामदेव बाबा म्हणाले की, पीएम मोदी सार्वजनिक पद्धतीने योग करतात. पीएम जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी लपून योग करायचे. त्यांच्या नव्या पिढीने मात्र योग केलाच नाही, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत गडबड चालू आहे. योग करणाऱ्यांना चांगले दिवस येतात. असे म्हणत त्यांनी गांधी घराण्याला लक्ष केले.

2014 साली काँग्रेसने लोकसभा निवडणूकीत वाईट प्रदर्शन केले होते. 2014 मध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. तर यंदाच्या लोकसभेत 52 जागांवर विजय मिळाला. याच कारणाने योग गुरु रामदेव बाबांनी राहुल गांधी, प्रियांका गांधींनी लक्ष केले. योग दिनाचे निमित्त साधत त्यांनी गांधी घरातील नवी पिढी योगा करत नसल्याने त्यांना यश मिळत नसल्याचे सांगितले.

21 जूनला जगभरात योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. भारतासह संयुक्त राष्ट्र आणि इतर देशाने योग दिवस साजरा करण्यासाठी आयोजन केले आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,