FPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून घ्या पूर्ण डिटेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बाबा रामदेव Baba Ramdev यांच्या पतंजली आयुर्वेदच्या मालकीची खाद्यतेल कंपनी रुची सोयाचे फॉलो ऑन पब्लिक इश्यू (FPO) द्वारे शेयर विकले जातील. नुकतीच कंपनीने ही माहिती दिली आहे. अखेर फॉलो ऑन पब्लिक इश्यू काय आहे ते जाणून घेवूयात…

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

काय आहे एफपीओ (FPO) :
फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) आयपीओ IPO प्रमाणेच असते.
जेव्हा शेयर बाजारात लिस्टेड एखादी कंपनी फंड जमवण्यासाठी सार्वजनिक प्रकारे आपले शेयर विकण्यासाठी प्रस्ताव देते त्यास फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणतात.
पहिल्या प्रस्तावास आयपीओ म्हणतात.
यानंतरच कंपनी लिस्टेड होते. परंतु लिस्टिंगनंतर शेयर विकण्याच्या सार्वजनिक प्रस्तावास एफपीओ म्हणतात.

Pune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा

4300 कोटी रुपये जमवण्याची योजना :
रुची सोयाने एफपीओ (FPO) द्वारे 4,300 कोटी रुपये जमवण्याची योजना आखली आहे.
माहितीनुसार, रुची सोयाने मागील शनिवारी सेबीकडे एफपीओच्या प्रस्तावाचा मसुदा जमा केला.
सूत्रांनुसार, सर्वकाही ठीक असेल तर सेबीच्या SEBI मंजूरीनंतर एफपीओ पुढील महिन्यात येऊ शकतो.

कंपनीने नियामकीय सूचनांमध्ये म्हटले आहे की,
त्यांच्या बोर्डाद्वारे गठित समितीने शेयर आणि सार्वजनिक विक्रीद्वारे पैसे जमवण्याचा प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
आता प्रवर्तकांना एफपीओच्या किमान नऊ टक्के भागीदारी कमी करावी लागेल.

2019 मध्ये केले होते अधिग्रहण :
2019 मध्ये रुची सोयाचे पतंजली आयुर्वेदने 4,350 कोटी रुपयात अधिग्रहण केले होते. यासाठी पतंजलीला कर्ज देखील घ्यावे लागले होते. कंपनी तेल मिल, खाद्यतेल Edible Oil प्रक्रिया आणि सोया उत्पादने इत्यादीचा व्यवसाय करते. महाकोष, सनरिच, रुची गोल्ड आणि न्यूट्रेला हे कंपनीचे मुख्य ब्रँड आहेत.

Web Title : baba ramdev led patanjali ayurveda firm ruchi soya files fpo document to raise up to rs 4300 cr

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक