पतंजलीने कोरोनिलच्या विक्रीतून केली 241 कोटींची कमाई, 4 महिन्यात 241 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसशी लढणारे औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच योगगुरू बाबा रामदेव (baba-ramdev) यांच्या पतंजली समूहाने कोविड-19 आजारावर ( COVID-19) कोरोनिल (Coronil) या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती. त्याची यशस्वी चाचणीही आपण घेतली आहे, असा दावा रामदेव बाबा यांनी केला होता. लाँचिंगपासूनच कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यानंतर आता पतंजलीने कोरोनिलच्या विक्रीतून 241 कोटी रुपये (coronil-kit-4-months-estimated-241-crore-rupees) कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.

रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाने अश्वगंधा, गुळवेल, श्वासारी, तुळशी अशा वनौषधींपासून तयार केलेले हे कोरोनिल औषध कोरोना रुग्णांना ठणठणीत बरं करू शकते असा दावा केला होता. त्यानंतर केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विक्री करून त्यातून कंपनीने विकले आहेत. तब्बल 241 कोटी कमावले आहेत. 23 जून ते 18 ऑक्टोबरदरम्यान एकूण 23 लाख 54 हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याची माहिती कंपनीच्या अधिकृत आकडेवारीत दिली आहे. ऑनलाइन माध्यमातूनही हे औषध मागवण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑर्डर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये हे औषध घरपोच दिले जाईल असा दावा कंपनीने केला होता. कोरोनिल औषधाची किंमत 545 रुपये ठेवली होती. एका हिंदी वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 23 जूनला रामदेव बाबांनी आचार्य बाळकृष्ण यांच्यासह पत्रकार परिषद घेत कोरोनिल औषध लॉन्च केले होते.

कोरोनिल औषधामुळे कोरोना आठवड्याभरात बरा होत असल्याचा दावा केला होता. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. औषधाच्या चाचण्या, ते तयार करण्यासाठी आवश्यक परवाने यावरून रामदेव बाबा आणि पतंजली वादात सापडले. केंद्र सरकारसोबतच अनेक राज्यांनीदेखील कोरोनिलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर पतंजलीनं यू-टर्न घेतला. कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा कधीही केला नव्हता, असे म्हणत कोलांटउडी मारली. मात्र आता पतंजलीने चार महिन्यांत तब्बल 241 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे.