‘कोरोना’ व्हायरसचं औषध शोधण्यासाठी बाबा रामदेव यांची पतंजली उतरली मार्केटमध्ये, सुरू केलं मेडिसीनचं ‘ट्रायल’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   पतंजली समूहाने म्हटले आहे की, आवश्यक नियामक मान्यता मिळाल्यानंतर मानवांमध्ये कोविड -19 च्या उपचारांसाठी क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. दरम्यान, पतंजली ग्रुपचे फ्लॅन्कशिप युनिट सर्व ग्राहक उत्पादने आणि आयुर्वेदिक औषधे तयार आणि विक्री करते. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले की, आम्ही येथे कोणत्याही रोग प्रतिकारशक्ती वाढविणाबद्दल बोलत नाही. येथे कोरोनावर उपचारासंदर्भात चर्चा केली जात आहे. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात नियामक मान्यता मिळाल्यानंतर कंपनीने इंदोर आणि जयपूरमध्ये ही क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे.

या कंपन्याही औषधांच्या शोधात

कोरोनावर उपचारात आतपर्यंत जगातील सर्वात मोठ्या फार्मा कंपन्यांचे नाव समोर येत होते, ज्यात गिलियड सायन्सेस, फायझर, जॉनसन अँड जॉनसन, मोडर्ना, इनोव्हिओ फार्मा आणि ग्लेक्सो स्मिथक्लाइन या नावांचा समावेश आहे. जी कोरोनावर औषध आणि लस तयार करण्यात गुंतलेली आहे . या मोठ्या कंपन्यांच्या यादीत पतंजलीचे नाव जोडणे ही पतंजलीसाठी मोठी उपलब्धी आहे.

पतंजलीची क्लिनिकल चाचणी सुरू

योगगुरू आणि उद्योजक बाबा रामदेव यांनी स्थापन केलेल्या पतंजलीने एक विशाल व्यवसाय साम्राज्य निर्माण केले आहे. 2019 मध्ये पतंजली आयुर्वेदची 8,500 कोटींची उलाढाल झाली आणि कंपनीत 50000 कर्मचारी कार्यरत होते. ब्रोकरेज हाऊस सीएलएसए आणि एचएसबीसी यांचे मत आहे की, पतंजली ही भारतातील सर्वात वेगवान एफएमसीजी कंपनी आहे. दरम्यान, विस्तार योजनांमध्ये दुर्लक्ष केल्यामुळे आणि उत्पादनांच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारींमुळे कंपनीला मोठा धक्का बसला आहे. कोरोना साथीच्या आजाराच्या उपचारासाठी क्लिनिकल चाचणी सुरू करणे, हे कंपनीसाठी एक अतिशय उत्साही पाऊल आहे.

आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, कोविड – 19 च्या रुग्णांसाठी पतंजली ग्रुपने फेब्रुवारी 2020 पासूनच उपचार सुरू केले आहेत. मार्चपर्यंत पतंजलीने हजारो कोरोना रूग्णांवर उपचार केले, परंतु हे रुग्ण कोणत्याही पुरावा आधारित क्लिनिक चाचणीचा भाग नव्हते. आमचा शोध उपचार म्हणून नोंदवण्यासाठी आम्हाला क्लिनिकल चाचणी घ्यावी लागेल. हे लक्षात घेऊन कंपनीने क्लिनिकल चाचण्यांवर नियामक मान्यता घेऊन ही चाचणी सुरू केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like