बाबा रामदेव यांनी शेयर केला आमिर खानचा जुना व्हिडिओ, ‘मेडिकल माफियां’ना दिले आव्हान (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योगगुरु बाबा रामदेव Baba Ramdev यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरातील डॉक्टरांमध्ये मोठा संताप आहे. डॉक्टरांनी 1 जूनला देशभरात याविरूद्ध निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर रामदेव सातत्याने अ‍ॅलोपॅथीवर निशाणा साधत आहेत. शनिवारी योगगुरु रामदेव Baba Ramdev यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर अभिनेता आमिर खानचा टीव्ही शो ’सत्यमेव जयते’चा एक जुना व्हिडिओ शेयर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले, या मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल तर आमिर खानविरोधात बोलावे.

बाबा रामदेव Baba Ramdev यांच्याकडून शेयर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आमिर खान डॉ. समित शर्मा यांच्याशी चर्चा करत आहे. या दरम्यान डॉ. समित शर्मा जेनेरिक औषधे आणि ब्रँडेड औषधांच्या किंमतीमधील फरक सांगत आहेत.

कानातील संसर्गाकडे दुर्लक्ष नका करू, ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात दिलासा

डॉ. समित शर्मा म्हणतात की, औषधांची खरी किंमत खुपच कमी असते. परंतु आपण जी औषधे बाजारातून खरेदी करतो, त्यासाठी आपण कमाल 50 टक्के जास्त पैसे देतो. टीव्ही शो सत्यमेव जयतेच्या या भागात औषधांच्या किंमतीवर चर्चा होत आहे.

अ‍ॅलोपॅथीवर योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्याने नाराज रेसिडेंट डॉक्टरांच्या असोसिएशनच्या संघटनांनी शनिवारी म्हटले की, ते एक जूनपासून राष्ट्रव्यापी आंदोलन करतील आणि हा काळा दिवस म्हणून पाळतील. संघटनेने वक्तव्य जारी करून रामदेव यांना जाहीर विनाअट माफी मागण्यास सांगितले आहे.

कोरोना व्हायरस संक्रमितांच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषधांवर रामदेव यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. रामदेव यांनी म्हटले होते की, कोविड-19 च्या उपचारात अ‍ॅलोपॅथी औषधांच्या सेवनाने लोकांचा जीव गेला आहे.

रामदेव यांच्या या वक्तव्याला जोरदार विरोध झाला, ज्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी यास अतिशय दुर्दैवी वक्तव्य म्हणत ते मागे घेण्यास सांगितले होते. रामदेव यांनी रविवारी आपले वक्तव्य मागे घेतले होते.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’