पतंजलि शेअर बाजारात उतरणार ?

वृत्तसंस्था – बाबा रामदेव यांची पतंजलि आयुर्वेद ही कंपनी शेअर बाजारात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान विक्री बाजारामध्ये ही बातमी खळबळ माजवण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातल्या आयपीओ किंवा प्रारंभिक समभाग पतंजलि आयुर्वेद ही कंपनी शेअर बाजारात उतरण्याची शक्यता असल्याचं समजत आहे. योग गुरू बाबा रामदेव यांनी या संदर्भात एक सूचक विधान केल्याची बातमी पीटीआयने दिल्याचे समोर आले आहे.

एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी बाबा रामदेवना विचारलं की, पतंजलिची नोंदणी जास्त भांडवल उभारण्यासाठी शेअर बाजारात करणार का? असा प्रश्न विचारला होता. दरम्यान यावर उत्तर देताना बाबा म्हणाले होते की, “एका महिन्यात या संदर्भात तुम्हाला मी गुड न्यूज देणार आहे.

“उत्पादनासाठी भारत हे उत्तम क्षेत्र बनू शकतं असं सांगताना बाबा रामदेव म्हणाले की, ” जर वाजवी दरांमध्ये उत्पादन क्षेत्रासाठी चांगल्या जागा उपलब्ध झाल्या तर भारत मॅन्युफॅक्चरिंग हब बनू शकेल. परंतु अनेक कंपन्यांना भेडसावत असलेल्या समस्या बघता बँकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.” याशिवाय ‘मल्यासारख्या घटना घडू नयेत यासाठी बँकांनी काळजी घ्यावी व चांगल्या उद्योजकांनाच कर्ज द्यावं’ अशी पुष्टीही रामदेव यांनी जोडल्याचं दिसून आलं.  पतंजलि ही धर्मादाय संस्था असे सांगत पतंजलिसाठी विदेशी भांडवल वा स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी हे दोन्ही पर्याय स्वीकारणार नसल्याचे दोन महिन्यांपूर्वी बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान , येत्या एक ते दोन वर्षात उत्पन्नाच्या बाबतीत हिंदुस्थान लीव्हरला मागे टाकण्याचा उद्देश असल्याचंही बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं. इतकेच नाही तर या क्षेत्रातला जगातला पहिल्या क्रमांकाचा ब्रँड पाच ते सहा वर्षांमध्ये बनवण्याची महत्त्वाकांक्षा रामदेव यांनी व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता  येत्या महिन्याभरात बाबा रामदेव पतंजलिचा आयपीओ बाजारात आणण्याची घोषणा करतील अशा चर्चांना आता वेग आल्याचे दिसत आहे.