‘बाबा’चा ‘नाद’ लागल्यानं तडफडते ‘ही’ मुलगी, ‘अश्लील’ व्हिडिओ पाठवून ‘संबंध’ ठेवण्यास केली ‘जबरदस्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आई-वडिल मुलांना मोबाईल फोन घेऊन तर देतात, परंतु काहीवेळा मुले त्याचा गैरवापर करतात हे त्यांना ठाऊक नसते. अशीच अमृतसरमधील एक अल्पवयीन मुलगी मोबाईलवरून सोशल साइटवर गप्पा मारताना बाबांच्या संपर्कात आली. बाबांनी तिला सांगितले की अभ्यास करणे आणि लिखाण करणे सर्व व्यर्थ आहे. जग काही नाही, बाबा सर्वकाही आहे. बाबाच्या सानिध्यात राहाल तर आयुष्य सुधारेल. अशा गोष्टी करून बाबांनी त्या मुलीला पूर्णपणे आपल्या बाजूने वळवले. जेणेकरून मुलगी त्याच्या जाळ्यात अडकेल. सध्या तिच्यावर मानसिक उपचार सुरु आहेत.

जेव्हा मुलीने सांगितले की तिला बाबांच्या आश्रयामध्ये जायचे आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने सांगितले की गेल्या दोन महिन्यांपासून तिची मुलगी दिल्लीच्या आसपासच्या भागातील एका बाबांच्या अनुयायांशी सोशल माध्यमातून संपर्कात होती. गेल्या आठवड्यात तिने आपले सामान पॅक केले आणि अ‍ॅक्टिव्हावरुन ती निघून गेली. त्यांनी तिला शहरभर शोधले व संध्याकाळी ती भेटल्यावर तिला घरी आणण्यात आले. कुटुंबीयांनी तिला घर सोडण्यामागचे कारण विचारले असता ती म्हणाली की तिला कशातच मन लागत नाही त्यामुळे तिला बाबांच्या आश्रयाला जायचे आहे. लोकांची सेवा करायची आहे. मुलीचे बोलणे ऐकून तिच्या आई वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला. तिला प्रेमाने विचारले असता तिने बाबाबद्दल सांगितले की त्याचे अनुयायी तिच्याशी गप्पा मारत आहेत. त्यांच्या सांगण्यावरून बाबांकडे खूप शक्ती आहे. ते म्हणतात की कुटूंब सोड कारण तुझे कुणीच नाही.

बाबांनी मुलीला अश्लील व्हिडिओ पाठविला

जेव्हा मुलीच्या आईने तिच्या मुलीचा मोबाइल तपासला तेव्हा बाबांचे अनुयायी तिच्याशी फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सतत संपर्क साधत होते. हा गटाकडून एकापेक्षा जास्त व्यक्तींशी अवैध संबंध ठेवण्यास प्रवृत्त केले जात होते. मुलीला काही अश्लील व्हिडिओदेखील पाठविण्यात आले होते. जेव्हा बाबांबद्दल इंटरनेटवर शोधले तेव्हा असे दिसून आले की तो दिल्लीच्या आसपासच्या भागातील आहे आणि काही किशोरवयीन मुली त्याच्या फॉलोवर्स आहेत आणि त्या इतर मुलींना फसवण्यास बाबाला साथ देतात. मुली बाबाचे व्हिडिओ पहात राहते. जेव्हा तिला समजावण्यात आले की हे बाबा वगैरे काही नसतात, परंतु हे ऐकून तिने विष प्राशन करून आत्महत्येची धमकी दिली. एकदा ती बरी झाल्यावर या बाबांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवून ते या प्रकरणी न्यायालयात आश्रय घेणार आहेत.

मुलीचा ब्रेन वाश करण्यात आला : डॉक्टर
त्याचवेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरजोतसिंग मक्कड म्हणतात की हे तथाकथित बाबा आणि त्यांचे अनुयायी मुलांना आमिष दाखवतात. ही अल्पवयीन मुलगी बाबांकडे जाण्याची आतुर आहे. तिला तिचे पालक सर्व कुटुंबीय खोटे आहेत असे वाटते. अल्पवयीन मुलीचा ब्रेन वाश करण्यात आला आहे. तिचा उपचार सुरू झाला आहे पण आता बरे होण्यास वेळ लागेल.

Visit : Policenama.com