मुंबई : Baba Siddique Death Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. सिद्दिकींच्या हत्येसाठी आरोपींना ऍडव्हान्स पेमेंट करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितलं की, शस्त्र विक्रेत्याने कुरिअर द्वारे पिस्तूल सोपवलं होतं.
हे पिस्तूल हल्ल्यादरम्यान वापरण्यात आलं. या हल्ल्यासाठी बिष्णोई गँगचा कर्नेल सिंग हा या प्रकरणात महत्वपूर्ण भूमिकेत होता. कर्नेल सिंगला २०१९ मध्ये हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच जेलमध्ये असताना त्याने बिष्णोई गॅंग सोबत संपर्क केला होता.
कर्नेल सिंग आणि त्याच्या गँगने अनेक दिवसांपासून सिद्दीकी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. सिद्दीकी यांची रेकी करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या सगळ्या कटात लॉरेन्स बिष्णोई गँगचा (Lawrence Bishnoi) हात असल्याचे पुढे आले आहे. आरोपींनी यासंबंधी चौकशीत सगळं उघड केलं आहे की, हे संपूर्ण काम अत्यंत योजनाबद्धरीत्या करण्यात आले होते.
२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्ल्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते.
चार जणांनी मिळून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते.
पंजाबमध्ये हे तिघेजण एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले.
जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले होते,
अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (दि.१२) नऊ वाजताच्या सुमारास वांद्रे येथील निर्मल नगर परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. (Baba Siddique Death Case)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa