फार्स करणारे उपोषणाला बसले, माजी मंत्री पाचपुतेंचा अभिनेत्री सय्यद यांना टोला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे साकळाई पाणी योजना होणारच आहे. मात्र काही लोकांना राजकारण आणि फार्स करायचा असल्याने ते उपोषणाला बसले आहेत. कोणताही चारित्र्यवान कार्यकर्ता आहे की त्यांनी सांगावे मी त्याला दम दिलेला आहे, असे माजी मंत्री भाजप बबनराव पाचपुते यांनी साकळाई पाणी योजनेसाठी उपोषणाला बसलेल्या दीपाली सय्यद यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पाचपुते म्हणाले की, साकळाई पाणी योजनेचे भांडवल करून कुणीही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये. मला या उपोषणामुळे कोणताही फरक पडणार नाही. कारण मी गेल्या २२ वर्षांपासून साकळाई पाणी योजनेबाबत पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे कोणाच्याही आरोपांकडे मला लक्ष द्यायची गरज नाही, असेही बबनराव पाचपुते यांनी सांगितले. माजी मंत्र्यांनी उपोषण करू नये, असा दम दिल्याचा आरोप सय्यद यांनी दिला होता. त्याला पाचपुते यांनी उत्तर दिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like