Babar Azam ODI WC 2023 | भारतात जाऊन, त्यांच्यासमोर वर्ल्ड कप जिंकायचाय! पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमचे मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाईन : Babar Azam ODI WC 2023 | आशिया चषक 2023 वरून भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये वाद सुरु आहे. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालेले आहे, मात्र टीम इंडिया पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे BCCI ने स्पष्ट जाहीर केले आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यादरम्यान पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आजम याने एक मोठे विधान केले आहे. बाबरने 2023 वर्षातील त्याच्या ध्येयांबाबत ICC ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हे विधान केले आहे. (Babar Azam ODI WC 2023)

काय म्हणाला बाबर आझम ?

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि तो जिंकण्याची इच्छा बाबरने यावेळी व्यक्त केली. आयसीसीच्या वन डे फलंदाजांमध्ये बाबर जुलै 2021 पासून नंबर वन आहे आणि त्यामुळेच मागील दोन वर्षांत तो वन डेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला आहे. बाबरला पाकिस्तान संघासाठी वन डे वर्ल्ड कप जिंकायचा आहे आणि संघाला नंबर वन टीम बनवायचे आहे असे मत बाबरने यावेळी व्यक्त केले. (Babar Azam ODI WC 2023)

इम्रान खान यांच्यानंतर बाबरला पाकिस्तान संघासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे.
”वर्ल्ड कप संघाचा सदस्य होण्याचा आणि देशासाठी तो जिंकण्याचा माझा निर्धार आहे.
वर्ल्ड कप येत आहे आणि चांगली कामगिरी करण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे, जेणेकरून आम्ही तो जिंकू शकू.
वैयक्तिक आयुष्यात अनेक ध्येय आहेत, परंतु सध्या मला वर्ल्ड कप जिंकणे, हेच ध्येय खुणावतेय.”
असे बाबर यावेळी म्हणाला. पाकिस्तानने 2022 मध्ये 9 वन डे सामने खेळले आणि त्यापैकी त्यांनी 8 सामने
जिंकले असून एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. 2023 च्या वर्ल्ड कपआधी पाकिस्तानचा संघ
घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे.
यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका आणि आशिया चषक स्पर्धा पार पडणार आहे.
त्यामुळे आता बाबर आझम आणि पाकिस्तानची टीम हे लक्ष गाठण्यात यशस्वी होतात का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :- Babar Azam ODI WC 2023 | babar azam reveals next goal with lofty 2023 ambition he wants to achieve leading pakistan to the icc cricket world cup title in india later this year