काय सांगता ! होय, पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूनं मोडला कोहलीचा ‘विराट’ रेकॉर्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये दहा वर्षानंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर या सामन्यात पाकिस्तानच्या बाबर आझम याने शानदार शतकी खेळी करत भारताचा कर्णधार विराट कोहली याचा रेकॉर्ड मोडला. या सामन्यात बाबर आझम याने 115 धावा केल्या असून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1 शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे.

या सामन्यात त्याने शतक झळकावताच 71 एकदिवसीय सामन्यांत 1 शतके झळकावण्याचा पराक्रम केला. त्यामुळे त्याने विराट कोहलीपेक्षा 11 सामने कमी खेळून हा रेकॉर्ड केला. विराट कोहली याने 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11शतके झळकावण्याचा विक्रम केला होता. हा सामना पाकिस्तानने 6 धावांनी जिंकत अनेक वर्षांनी मायभूमीवर विजय साकार केला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात वेगवान शतके झळकावण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावे असून त्याने 64 सामन्यांमध्ये 11 शतके झळकावली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचाच क्विंटन डीकॉक आहे. त्यानंतर आता बाबर आझम याचा तिसरा क्रमांक लागला आहे.

दरम्यान, 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 1o वर्षांनी पुन्हा पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला असून पुन्हा श्रीलंकेच्याच संघाने हा दौरा केला आहे. तर बाबर आझम हा दिवसेंदिवस अधिक चांगला खेळाडू बनत चालला असून त्याची सरासरी देखील बाकी खेळाडूंच्या तुलनेने चांगली आहे.

https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/cricket-news/babar-azam-pips-virat-kohli-to-become-third-quickest-to-11-odi-tons/articleshow/71386458.cms

image.png