Babar Azam-Virat Kohli | बाबर आझमने रिझवानसोबत रचला इतिहास, विराट कोहलीला टाकले मागे

पोलीसनामा ऑनलाईन : Babar Azam-Virat Kohli | पाकिस्तानने (Pakisthan) त्यांच्याच घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या (England) दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह त्यांनी सात सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानसमोर 200 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 19.3 षटकात एकही विकेट न गमावता 203 धावा करत हा सामना जिंकला आहे. या विजयाबरोबरच बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) एक विश्वविक्रम (World Record) आपल्या नावावर केला आहे. (Babar Azam-Virat Kohli)

या सामन्यात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने धावाचा पाठलाग करताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (T-20 International Cricket) सर्वात मोठी सलामीची भागीदारी केली आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथमच सलामीच्या जोडीने 200 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य विकेट न गमावता पार केले आहे. याबरोबर बाबर-रिजवानने न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) आणि मार्टिन गप्टिल (Martin Guptill) यांचा विक्रम मोडला आहे. या दोन्ही किवी सलामीवीरांनी 171 धावांची नाबाद सलामी दिली होती. (Babar Azam-Virat Kohli)

या सामन्यात बाबर आझमने 66 चेंडूत नाबाद 110 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे दुसरे शतक होते. या शतकाबरोबरच बाबरने टी-20 फॉरमॅटमध्ये आपल्या 8 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही (Virat Kohli) मागे टाकले. बाबरने 218 डावात 8 हजार धावा पूर्ण केल्या. तर विराट कोहलीला 8 हजार धावा पूर्ण करायला 243 डाव खेळावे लागले होते. वेस्ट इंडिजचा (West Indies) ख्रिस गेल (Chris Gayle) सर्वात जलद 8000 टी-20 धावा करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे ज्याने 213 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

Web Title :- Babar Azam-Virat Kohli | babar azam mohammad rizwan highest opening partnership record virat kohli record break sports cricket

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Accident News | धक्कादायक! ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून 6 महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Hardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा