Babasaheb Purandare | ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचे निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. नुकताच त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्या निधनाने प्रतिभावंत व्यक्तीमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड येथे 29 जुलै 1922 रोजी झाला होता. ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम केले. याच ठिकाणी त्यांची इतिहास संशोधक म्हणून वाटचाल सुरु झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) 2015 सालापर्यंत तब्बल 12 हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत.

बाबासाहेबांचे लेखन

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी तसेच नाट्यलेखन व जाणाता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. जाणता राजा (Janta Raja) या महानाट्याचे 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. जाणता राजा या महानाट्याचा पहिला प्रयोग 1984 मध्ये झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची आर्थिक मदत केली. बाबासाहेब पुरंदरे यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने (Padma Vibhushan Award) त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Web Titel :  Senior historian Shivshahir Babasaheb Purandare passed away in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा