बाभळगाव : पावसामुळं शेळ्यांचे 31 पिल्लं दगावली, आर्थिक मदतीची मागणी

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन –  पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथे पाठी मागील आठवड्यात शेळ्यांचे 31 पिल्ले दगावले. पाठी मागील आठवड्यात सततचा पाऊस असल्याने एक जागीच शेळ्या बांधून ठेवावे लागत असल्याने काही शेळ्यांना पायाला सूज आली असून काहींना खुरकूत झाल्याचे म्हटले जात आहे. अशातच शेळ्यांची पिल्ले बोकड व पाट असे एकूण 31 पिले दगावल्याची माहिती प्राप्त होत आहे. शेळ्या पासून कुटुंबाचा आर्थिक उदरनिर्वाह करणाऱ्या बाभळगाव येथील ग्रामस्थांनी पाथरी तहसीलदार सुभाष कट्टे यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. शेळ्यांचे पिल्ले दगावण्याला निसर्गाचा प्रकोप कारणीभूत ठरला असल्याचे म्हटले आहे. ( 29 ) “सप्टेंबर” रोजी मुंजाभाऊ सोनटक्के यांनी पाथरीचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेळ्या पासूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

अशातच निसर्गाच्या प्रकोपचा फटका बसल्याने आर्थिक हानी झाली. त्यामुळे शासनाकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी अशी मागणी मुंजाभाऊ सोनटक्के यांनी निवेदनाद्वारे पाथरीचे तहसीलदार सुभाष कट्टे यांच्याकडे केली आहे. निवेदनावर मुंजाभाऊ सोनटक्के, मदन दंडवते, भागवत निर्वळ यांचे शेळ्याचे पिल्ले दगावले असल्याचे चे म्हटले आहे.