बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार ; ओवेसींचे वादग्रस्त ट्विट

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक वादगृस्त् ट्विट केले आहे. ओवेसी यांनी बाबरी मशिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असे म्हटले आहे. कालच ओवेसींनी बाबरी मशीद प्रकरणावरुन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सुनावले होते.

बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार इन्शाअल्लाह, असे ट्विट ओवेसींनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाबरीच्या एका जुन्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोबरोबरच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीची वास्तू पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनादरम्यानचाही फोटो ट्विट केला आहे. अनेकांनी बाबरीसंदर्भातील ट्विट केलं असून ओवेसींचे ट्विटही व्हायरल झाले आहे. यापूर्वीही त्यांनी बाबरीसंदर्भातील वक्तव्य केली आहेत. दरम्यान, प्रियंका गांधी यांनी काल ट्विटरवरुन राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात एक पत्रक ट्विटवरुन पोस्ट केले होते. त्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सिता मातेचे मंदिर उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. याच ट्विटवरुन ओवेसी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आनंद आहे की ते (काँग्रेस) आता दिखावा करत नाही. जर त्यांना प्रखर हिंदुत्वावाद्यांची बाजू घ्याची असेल तर आमची काहीच हरकत नाही. मात्र ते करताना ही बंधुभावासंदर्भातील उथळ वक्तव्य का करावीत? असे ओवेसी यांनी प्रियंका यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.