बाहुबली दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांना झाला ‘कोरोना’, घरीच झाले क्वारंटाइन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रभास स्टारर बाहुबली आणि बाहुबली -2 चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटूंबाला हलका ताप आला होता, त्यानंतर त्यांनी तपासणी करण्याचा निर्णय घेतला. खुद्द राजामौली यांनी आपल्या व्हेरिफाइड ट्विटर हँडलवरून ट्विट करुन चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यांच्या ट्विटवर, लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि लवकर ठिक होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राजामौली यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मला आणि माझ्या कुटुंबाला काही दिवसांपासून ताप येत आहे. हळूहळू ताप स्वतःहून कमी झाला परंतु आम्ही चाचणी केली. निकालांमधून कोविड -19 ची सकारात्मक लक्षणे आढळली. “आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, घरी क्वारंटाइन राहत आहोत. सध्या आम्हा सर्वांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. आम्ही आता बरे आहोत, परंतु तरीही आम्ही प्रिकॉशन्स व इंस्ट्रक्शन्सचे पालन करीत आहोत.”