शिरूरमधून बाबुराव पाचर्णे 14 हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे शिरूरमधून भाजपचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे हे 14 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. पाचर्णे यांना राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांनी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

बाबुराव पाचर्णे हे मोदी लाटेमुळे आमदार झाले होते असे मत अनेकदा राष्ट्रवादीने व्यक्त केले होते. मात्र राष्ट्रवादीत अनेक अंतर्गत वादाला सुरुवात झाल्याने अशोक पवार यांच्याबाबत चिंता व्यक्ती केली जात होती. मात्र नवव्या फेरीनंतर देखील अशोक पवार मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.

2014 च्या विधानसभेला भाजपचे शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतली. सध्या बाबूराव पाचर्णे शिरूरचे नेतृत्व करत होते, अमित शहा यांनी देखील बाबुराव पाचर्णे यांच्यासाठी मोठा रोड शो घेतला होता.

शिरूमधून मनसेने देखील उमेदवार दिलेला आहे मात्र थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढाई सुरु असल्याचे चित्र सध्या तरी दिसून आले आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व राहिलेले आहे मात्र गेल्या वेळी ग्रामीण भागात राष्ट्रवादीला फटका बसला होता.

 

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com