मोदींचा करिष्मा : मुस्लीम कुटुंबाने बालकाचे नाव ठेवले नरेंद्र मोदी

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मोदींच्या करिष्म्याने पुन्हा एकदा भाजपने विजयश्री खेचून आणताना विक्रमी ३५३ जागा मिळवल्या. भारतात मोदींची लोकप्रियता यामुळे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम नागरिक देखील मोदींना समर्थन देताना दिसून येत आहेत. याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशातील गोंडा या शहरात मुस्लीम कुटुंबात झालेला बालकाचा जन्म म्हणून समोर आले आहे.

२३ मे रोजी ज्या दिवशी भारतात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी या बालकाचा जन्म झाला म्हणून, त्याच्या कुटुंबियांनी त्या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्मृती कायमस्वरूपी जपत या मुस्लीम कुटुंबाने आपल्या बालकाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले. मूस्लीम कुटुंबातील या बालकाचा जन्म २३ मे या लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशीच झाला. त्यामुळे या बालकाचे नाव त्यांनी नरेंद्र मोदी ठेवत सर्वधर्मसमभाव जपत पंतप्रधान मोदी यांच्याविषयीचे प्रेम देखील व्यक्त केले आहे.

दरम्यान, या उदाहरणामुळे मोदींनी निवडणुकीत मिळवलेले यश हे त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष आहेच, मात्र याचबरोबर आजच्या या उदाहरणावरून देखील हे स्पष्ट होत आहे. नरेंद्र मोदींवर संपूर्ण भारतात जनता किती प्रेम करते याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.