Baby Born Without Face | आश्चर्यकारक ! चेहर्‍याशिवाय झाला मुलीचा जन्म, डॉक्टर म्हणाले – ‘जगणार नाही आणि मग झाला ‘हा’ चमत्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Baby Born Without Face | जगभरात अनेक आश्चर्यकारक घटना अधुन-मधुन घडत असतात. अशीच एक घटना दक्षिण अमेरिकेतील देश ब्राझीलमधून समोर आली आहे. येथ एका बाळाचा जन्म अशा स्थितीत झाला जे पाहून डॉक्टरसुद्धा हैराण झाले. ही मुलगी चेहर्‍याशिवाय जन्माला (Baby Born Without Face) आली होती. डॉक्टरांनी ती जगणार नाही असे म्हटले होते. परंतु नंतर असा चमत्कार झाला जो पाहून सर्वजण हैराण झाले.

 

डॉक्टर म्हणाले, काही तासांचीच पाहुणी
या मुलीने मेडिकल सायन्सची भविष्यवाणी चुकीची ठरवली आणि जगली. मीडिया रिपोर्टनुसार, मुलीच्या जन्मानंतर डॉक्टरांनी म्हटले होते की, मुलगी काही तासांचीच पाहुणी आहे.

 

केली अंत्यसंसकाराची तयारी
डॉक्टरांचे हे म्हणणे ऐकून तिच्या आई-वडिलांना धक्काच बसला. त्यांनी विचार केला की, जर डॉक्टरांनी म्हटले आहे की मुलगी जगणार नाही तर अगोदरच अंत्यसंस्काराची तयारी करावी. परंतु नंतर असा चमत्कार झाला की कुणी कल्पनाही करू शकत नाही. आता ही मुलगी नऊ वर्षांची झाली आहे.

 

चेहर्‍यांची 40 हाडे अविकसित
ब्राझीलच्या बारा डी साओ फ्रान्सिस्कोच्या व्हिटोरिया मार्चियोलीचा जन्म 9 वर्षापूर्वी अतिशय दुर्मिळ स्थितीत झाला होता. व्हिटोरिया मार्चियोलीला ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम नावाचा आजार होता. या आजारामुळे तिच्या चेहर्‍यांची 40 हाडे विकसित होऊ शकली नव्हती.

 

भविष्यवाणी चुकीची ठरवली
आजारामुळे मुलीचे डोळे, तोंड आणि नाक विकसित झाले नव्हते. ज्यामुळे तिला पाहून वाटत होते की, ती काही तासात मरू शकते. डॉक्टरांनी म्हटले होते की, मुलगी काही तासच जिवंत राहू शकते. मात्र तिने डॉक्टरांची ही भविष्यवाणी चुकीची ठरवली. (Baby Born Without Face)

 

तोंडाच्या 8 सर्जरी केल्या
दोन दिवसानंतर एका तज्ज्ञांच्या देखरेखीत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एक आठवडाभर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर तिला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी हळुहळु मोठी होऊ लागली आणि तिचे डोळे, नाक आणि तोंडाच्या आठ सर्जरी करण्यात आल्या.

 

नुकताच साजरा केला 9 वा वाढदिवस
अलिकडेच टेक्सासच्या एका हॉस्पिटलमध्ये तिची आणखी एक सर्जरी करण्यात आली.
मुलीचे आई-वडील रोनाल्डो आणि जोसिलीन लोकांच्या मदतीने तिला नवीन जीवन देण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हिटोरिया मार्चियोली नावाच्या या मुलीने याच महिन्यात आपला नववा वाढदिवस सुद्धा हॉस्पिटलमध्ये साजरा केला.

Web Title :- Baby Born Without Face | baby born in brazil without face proves doctor s predictions wrong

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Abdul Qadeer Khan Died | पाकिस्तानच्या अणू कार्यक्रमाचे जनक डॉ. अब्दुल कादिर खान यांचे कोरोनाने निधन

Navratri Parv | नवरात्रीत जर चुकून सुटला उपवास तर घाबरू नका, ‘या’ उपायांनी कायम राहील मातेची कृपा; जाणून घ्या

Mumbai Cruise Drug Case |धक्कादायक ! सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवून घेऊन गेली होती मुनमुन, NCB ने शेयर केला व्हिडीओ