Baby Care In Summer | उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांची काळजी करणे आवश्यक; अशी घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Baby Care In Summer | उन्हाळ्याच्या (Summer) दिवसात माणसाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच या दिवसात विशेष म्हणजे लहान मुलांची (Small Child Care) काळजी करणे महत्वाचे आहे. एप्रिल, मे या महिन्यात खास तर अधिक उन्हाचा चटका लागतो. त्यामुळे कडक उन्हापासून मुलांना सुरक्षित ठेवणं हे पालकांसाठी आव्हानात्मक काम आहे. नवजात बाळ असेल तर उष्णतेची फार काळजी घेणे आवश्यक असतं. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी आणि काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते (Baby Care In Summer). यामुळे मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या (Summer Care Tips For Baby).

 

1. मुलांना हायड्रेटेड ठेवा (Keep Children Hydrated) –
मुलांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्यांना भरपूर पाणी देण्याचा प्रयत्न करा. पाण्यामुळे मुलांच्या शरीरातील उष्णता कमी होऊन शरीर थंड आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. दुसरीकडे, जर तुमचे बाळ सहा महिन्यांपेक्षा कमी वयाचे असेल, तर त्याला निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी स्तनपान करा. (Baby Care In Summer)

 

2. सुती कपड्यांची मदत घ्या (Take The Help Of Cotton Clothes) –
मुलांना उन्हाळ्यात विविध प्रकारचे फॅब्रिक कपडे घालणे टाळावे. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर पुरळ उठण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत मुलांना सुती कपडेच घालावेत. त्यामुळे मुलांना खूप आराम वाटेल. तसेच बाहेर जाताना उन्हापासून बचाव करण्यासाठी मुलांचे डोके सुती कपड्याने झाकायला विसरू नका.

3. सूर्यप्रकाश टाळा (Avoid Sunlight) –
उन्हाळ्यात सहसा 11 ते 4 वाजेच्या दरम्यान उष्णता जास्त असते. अशा वेळी मुलांना चुकूनही घराबाहेर नेऊ नका. लहान मुलांच्या शरीरात मेलेनिन फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम मुलांच्या त्वचेवर, केसांवर आणि डोळ्यांवर होतो.

 

4. कॉटन नॅपी घाला (Wear A Cotton Nappy) –
उन्हाळ्यात मुलांची त्वचा पुरळ मुक्त ठेवण्यासाठी कॉटन नॅपी घालणे चांगले. लंगोट बदलताना मुलांच्या त्वचेवर थोडी हवा येऊ द्या. याशिवाय लहान मुलांना पुरळ येण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्वचा कोरडी ठेवण्यासाठी बेबी क्रीम किंवा पावडरची (Baby Cream Or Powder) मदत घ्या.

 

5. उष्माघातापासून बचाव (Prevention Of Heatstroke) –
उन्हाळ्यात घाम येणे आणि शरीरावर हवा खेळती राहत नसल्यामुळे मुलांना घामोळ्यांचा त्रास होऊ लागतो. घामोळे होऊ नयेत म्हणून त्यांना फक्त सुती कपडे वापरा. त्यामुळे त्याच्या शरीरात हवा लागेल. घामोळ्यांसाठी बेबी पावडर लावा आणि तेल अजिबात वापरू नका.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Baby Care In Summer
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Drinking Tea In The Morning | सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिता का?; आरोग्याचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या

 

Excessive Consumption Of Raisins Is Harmful | मनुके आवडीने खाताय?; अति सेवन आरोग्यास ठरेल नुकसान, जाणून घ्या

 

Health Care Tips | जेवल्यानंतर ‘ही’ चुक करत आहात का?; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम, जाणून घ्या