पेंटा व्हायलंटची लस दिली आणि दुसऱ्याच दिवशी बाळ दगावले 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंढरपुरातील कौठाळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. या गावातील साडेतीन महिन्याच्या बाळाला पेंटा व्हायलंटची लस दिली आणि दुसऱ्याच दिवशी या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप या बाळाच्या पालकांनी केला आहे. अंगणवाडीतील वैद्यकीय पथकाकडून  पेंटा व्हायलंटची लस या बाळाला टोचण्यात आली होती.

दत्तत्रय आठकाळे यांच्या बाळाला मंगळवारी पेंटा व्हायलंटची लस  टोचण्यात आली होती मात्र आज सकाळी या बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. साडेतीन महिन्याच्या चिमुकल्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,नोव्हेंबरच्या ३ तारखेला चिमुकलीला पोलिओ डोस पाजण्यात आला होता. हा डोस पाजल्यानांतर या मुलीच्या शरीरावर रिऍक्शन आली आणि संध्याकाळी तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त चिमुकलीच्या नातेवाईकांनी सातारा येथील ग्राम पंचायतीमध्ये गोंधळ घातला. पोलिओचा डोस पाजल्यामुळेच चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात योग्य ती चौकशी केली जाईल असं औरंगाबादच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

यापूर्वी देखील लसीकरणानंतर चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील सातारा परिसरात पोलिओ डोस दिल्यानंतर एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पोलिओ डोस दिल्यानंतरच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या चिमुकलीचे नाव इलमा इमरान सय्यद असं आहे.