‘बेबी डॉल’ सनी आणि DJ ब्रावोचा डान्स सोशल मीडियावर ‘व्हायरल’ ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी नेहमीच आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. अलीकडेच सनीनं बिकिनी फोटोंनी सोशलवर धुमाकूळ घातला होता आणि इंटरनेट हादरून दिलं होतं. यानंतर आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सनीनं डान्स केला आहे. हा डान्स एखाद्या अभिनेत्या सोबत नाही तर क्रिकेटर ड्वेन ब्रावो उर्फ डीजे ब्रावोसाबत केला आहे.

सनीनं या लॉकाऊनच्या काळात लॉक्डअप विथ सनी हा लाईव्ह चॅट शो सुरू केला आहे. आजपर्यंत अनेक कलाकरांना तिनं आमंत्रित केलं होतं. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओदेखील वेळोवेळी समोर आले आहेत. अशात मंगळवारी (दि 28 एप्रिल) पाहुणा म्हणून वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध क्रिकेटर डीजे ब्रावो आला होता. यावेळी सनी आणि ब्रावो यांनी ऑनलाईन ठेका धरला. लाईव्ह चॅटमध्ये दोघंही थिरकताना दिसले.

https://youtu.be/h7r6MPlmzOk

सनीच्या या चॅट शोमध्ये आतार्यंत अरबाज खान, जॉर्जिया एंड्रियानी, मंदाना करीमी, आशिष, चंचलानी, डब्बू रत्नानी अशा अनेकांनी हजेरी लावली आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यानं सारं काही ठप्प आहे.