‘बेबी डॉल’ सनी लिओनी पोर्न इंडस्ट्री सोडून ‘हे’ काम करणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोर्न इंडस्ट्रीमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळविल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सनी लिओनी आता नवीन काम सुरु करणार आहे. सनी लिओनी चित्रपटसृष्टी सोडून शिक्षण क्षेत्रामध्ये पाऊल टाकणार आहे. याचा अर्थ असा नाही की, सनी इंडस्ट्रीला अदविदा करणार. ती लहान मुलांसाठी शिक्षण देण्यासाठी स्कूल सुरु करण्याच्या विचारात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सनी लहान मुलांना एज्युकेशन देण्यासाठी स्कूल सुरु करण्याचा विचार करत आहे. सनी यावर खूप दिवसांपासून काम करत आहे. सनीने यासाठी खूप रिसर्चही केला आहे. सनीने स्वतः स्कूलमध्ये दिली जाणारी सुविधा, थीम, फिचर्सची तयारी केली आहे. या स्कूलची थीम एक आर्ट स्कूल नाही तर पुर्णपणे प्लेस्कूल असणार आहे. ज्यामध्ये लहान मुले आर्ट आणि फ्यूजन शिकू शकतील.

सनीला लहान मुले खूप पसंत आहे. तिने ३ मुलांना दत्तक घेतले आहे. लहान मुलांची आवड असल्यामुळे तीला स्कूल सुरु करायचे आहे. जेणेकरुन लहान मुलांचा चांगला विकास होईल. तिचे म्हणणे आहे की, लहान मुलांच्या पुर्ण विकासासाठी त्यांच्या जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत त्यांना काही गोष्टी शिकवाव्या लागतात. त्याच वयात मुले खूप काही शिकतात.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन