‘लॉकडाऊन’मध्ये सुरू होणार ‘बेबी डॉल’ सनीचा नवीन चॅट शो ! जाणून घ्या कधी अन् कुठं


पोलीसनामा ऑनलाईन :
सध्या देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. सर्वजण आपापल्या घरात कैद आहेत. सध्या सोशल मीडियावरून लोक एकमेकांच्या संपर्कात येताना दिसत आहेत. अशात आता बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी हिनं आपल्या एका चॅट शोची घोषणा केली आहे. सनीनं स्वत: तिच्या इंस्टावरून याबाबत माहिती दिली आहे.

सनी लिओनीच्या नव्या चॅट शोचं नाव आहे लॉकडाऊन विद सनी. सनीनं शोचं पोस्टरही तिच्या इंस्टावरू शेअर केलं आहे. या शोमध्ये सनी अनेक व्यक्तींसोबत बातचित करताना दिसणार आहे.

सनी लिओनीचा शो लॉकडाऊन विद सनी मध्ये तिच्या सोबत बॉलिवूडचा फेमस फोटोग्राफर डब्बू रतनानी आणि मंदाना करीमी हेही सहभागी आहेत. पहिल्या एपिसोडसाठी तिनं युट्युब सेंसेशन अनीसा दीक्षित हिला ऑनलाईन गेस्ट म्हणून बोलवण्याच ठरवलं आहे. या शोमध्ये पाहुण्यासोंबत हलकी फुलकी बातचित असेल असंह सनीनं सांगितलं आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.