27 वर्षे जुन्या भ्रूणापासून जन्मली मुलगी, बनवला अनोखा विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत अशी घटना उघडकीस आली आहे जिथे एका 27 वर्षे जुन्या गर्भापासून एका मुलीचा जन्म झाला आहे. 27 वर्षांपूर्वी फ्रिज केलेल्या गर्भापासून (भ्रूण) मुलगी जन्माला आली, हा एक अद्वितीय विक्रम आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, हे प्रकरण अमेरिकेतील टेनेसी शहरातील आहे. 1992 मध्ये, एका महिलेने गोठवलेल्या गर्भाला 12 फेब्रुवारी 2020 रोजी टीना नावाच्या स्त्रीमध्ये ट्रान्सप्लांट केले गेले. हा आतापर्यंतचा सर्वांत लांब फ्रिज गर्भ आहे, ज्यापासून एक मुलगी जन्माला आली. टीनाने 26 ऑक्टोबर रोजी मोली नावाच्या एका मुलीला जन्म दिला.

अहवालानुसार, 2017 मध्ये टीनाची पहिली मुलगी एमासुद्धा याच तंत्राने जन्मली होती. एमाचा गर्भ 24 वर्षांचा होता. टीना म्हणाली की, तिचा नवरा सिस्टिक फायब्रोसिसचा पेशंट आहे. हा आजार एखाद्या मुलास जन्म देण्यास मोठा अडथळा आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा अ‍ॅम्ब्रोयो फ्रिजिंगसह बाळाला जन्म देण्याचे ठरविले.

टीना यांनी हेदेखील सांगितले की, मला माझ्या वडिलांकडून या तंत्राची माहिती मिळाली. एका मासिकातून त्यांना एम्ब्रिओ फ्रिजिंग तंत्राबद्दल माहिती मिळाली. आम्ही या तंत्राविषयी माहिती गोळा केली आणि राष्ट्रीय भ्रूण देणगी केंद्रावर पोहोचलो. येथून प्रक्रिया सुरू झाली.

जेव्हा स्त्री गर्भवती होते, तेव्हा गर्भाचा विकास सुरू होतो. बरेच जोडपे हा गर्भ गोठवतात, जेणेकरून भविष्यात जेव्हा त्यांना आई व्हायचं असेल तेव्हा ते वापरू शकतील. याव्यतिरिक्त काही जोडपे ते डोनेटही करतात.