धक्‍कादायक ! आईनं पोटच्या गोळ्याला ‘फेकलं’ नाल्यात, देवरूपी श्‍वानानं ‘वाचवलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा आपण पाहतो की प्राण्यांना माणसापेक्षा आधिक माया असते. अनेकदा असे लक्षात येते की प्राणी असे काही काम करुन जातात जे माणसांना देखील लाजवतील. असाच एक प्रकार हरियाणात घडला. हरियाणातील कैथल येथे माणसाला लाजवेल आणि प्राण्यांचे कौतूक होईल असा प्रकार घडला. एका महिलेने नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीला एक प्लास्टिकच्या पिशवीत टाकून नाल्यात टाकून दिली. परंतू एका मुलीला एका श्वानाने वाचवले. हा श्वान या मुलीसाठी देवदूत बनून आला आणि त्या मुलीचा जीव वाचवला. या श्वानाने ना की फक्त त्या प्लॉस्टिकमध्ये असलेल्या मुलीला बाहेर काढले तर भूंकुन भूंकुन सर्व लोकांना जमा केले जेणे करुन लोक मदत करतील.

सीसीटीव्हीत हे स्पष्ट होते की जे काम एक महिलेने करायला हवे होते ते काम एका प्राण्याने केले. एकीकडे महिलेने त्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे एक श्वानाने त्या मुलीला जीवदान दिले. ही घटना कैथल येथे डोगरा मध्ये घडली.

नक्की काय घडले

गुरुवारी सकाळी जवळपास ४ वाजून १८ मिनिटांनी एका महिलेने एका मुलीला प्लॉस्टिकमध्ये घालून नाल्यात फेकण्यात आले. मुलीला नाल्यात फेकल्यानंतर बरोबर ९ मिनिटांनी एक श्वान तेथे पोहचला आणि त्या श्वानाने त्या मुलीला नाल्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या श्वानाने भूंकण्यास सुरुवात केली.

कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज एकूण मुखत्यार नामक एक व्यक्ती जागा होऊन तेथे पोहचला. जेव्हा मुखत्यार यांनी त्या प्लॉस्टिक मधील मुलीला पाहिले तेव्हा ते हैराण झाले. मुखत्यार यांनी लगेचच याबाबतची माहिती शेजारच्यांना दिली, त्यानंतर पोलीसांना बोलावून मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी यानंतर मुलीला चंदीगढ येथे रुग्णालयात दाखल केले. आता या मुलीची तब्येत आता ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पोलिसांनी त्या अज्ञात महिलेच्या विरोधात आयपीसी कलम ३१७ अंतर्गत केस दाखल करुन घेतली आहे आणि या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like