Baby Products | बेबी प्रॉडक्टमध्ये वापरले जाणारे केमिकल मुलांच्या IQ आणि मेमरीला करते प्रभावित – रिसर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Baby Products | बेबी प्रॉडक्टला अग्नीरोधक (Retardant) आणि लवचिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायनांच्या केलेल्या वापरामुळे मुलांच्या (Baby Products) मेंदूच्या विकासात अडथळ येत आहे. संशोधनानुसार, हा धोका त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, जितका अगोदर विचार केला होता. बेबी प्रॉडक्टमध्ये वापरली जाणारी रसायने, (Chemicals) फ्लेम रिटरडेंट्स (Flame Retardants) आणि प्लास्टिसायजर (Plasticizers) म्हणून ओळखली जातात.

एका संशोधनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे. संशोधनानुसार ऑर्गेनोफॉस्फेट एस्टरचा वापर अनेक प्रकारच्या प्रॉडक्टला (Baby Products) फायर प्रूफ बनवण्यासाठी केला जातो, ज्याच्या संपर्कात आल्याने तरुणांची आयक्यू लेव्हल, एकाग्रता आणि बुद्धीवर खुप वाईट परिणाम होतो.

हे केमिकल लोकांमध्ये कॅन्सर आणि फर्टिलिटीसंबंधी समस्या वाढवते. कॅरोलिन युनिव्हर्सिटीच्या डॉ. हीथर पॅटीसोले यांच्यानुसार, टीव्हीपासून कारच्या सीटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये ऑर्गनोफॉस्फेट एस्टरचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो की, ते सुरक्षित आहे.

ऑर्गनोफॉस्फेट एस्टर (Organophosphate Easter) सर्व पिढ्यांमध्ये मेंदूच्या विकासासाठी मोठा धोका आहे. भविष्यात यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. याचा वापर फायर सेफ्टी रेग्युलेशनच्या नावावर केला जातो. स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे ऑर्गनोफॉस्फेट एस्टर हात किंवा फेसद्वारे कोणत्याही मनुष्याच्या शरीरात जाऊ शकते.

बेबी केयर प्रॉडक्ट (Baby Products) धेताना काही सामान्या गोष्टींकडे लक्ष ठेवले तर चांगली प्रॉडक्ट निवडता येतील.

 

बाळाच्यासाठी त्वचेची काळजी घेणारी उत्पादने

मुलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. पहिली पाच वर्षे खूप काळजी घ्यावी लागते.
म्हणून, उत्पादन निवडताना रिव्ह्यू वाचा. ते वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का, हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

 

लहान मुलांची खेळणी

खेळणी खरेदी करण्यापूर्वी, रिव्ह्यू वाचा, कारण अनेक खेळणी जेलीसह येतात, ती खूप सुंदर दिसतात, फ्रेंडली देखील असतात.
मात्र, जेलीची खेळणी अनेक वेळा मुले चाटतात. त्यामध्ये अनेक प्रकारची रसायने असतात.
वेळोवेळी खेळणी स्वच्छ करा जेणेकरून मुलाने तोंडात घातले तरी जंतू जाणार नाहीत.

Web Title :- Baby Products | chemicals used in baby products affect childrens iq memory research

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 153 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

TCS Recruitment Drive | टीसीएस 35000 ग्रॅज्युएट्सला देतंय नोकरी, तुम्ही सुद्धा व्हा तयार; जाणून घ्या

Maharashtra Bandh | ‘महाराष्ट्र बंद’वरून अमृता फडणवीस अन् राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर ‘आमनेसामने’