10 वर्षाच्या मुलाकडून पेग्नंट झाली 13 वर्षाची मुलगी, डॉक्टर झाले ‘हैराण-परेशान’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – एका तेरा वर्षाची मुलगी अचानक गरोदर राहिल्याने तिचे कुटुंबीय मोठ्या काळजीत पडले आहेत तर डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे कारण त्या मुलाचा बाप हा केवळ दहा वर्षांचा एक मुलगा आहे.

डरिया आणि इवान नावाचे जोडपे रुस मधील Zheleznogorsk शहरात राहतात. एका टीव्ही शोमध्ये दोघांनी सहभाग नोंदवला आणि आपल्या नात्याबाबत अनेक खुलासे केले. इवानच्या डॉक्टरांनी प्रजननासाठी त्याचा स्पर्म अजून मॅच्युअर नसल्याचे सांगितले आहे तर मुलीने माझा अजून कोणत्याच दुसऱ्या मुळाशी संबंध नसल्याचे म्हंटले आहे.

पालकांच्या संमतीने या दोनीही मुलांनी टीव्ही शोच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. या तरुण जोडप्यावरून स्थानिक समाजात गंभीर स्वरूपाची चर्चा सुरु आहे.

आठ आठवड्यांपासून गरोदर असलेली ही मुलगी आपल्या मुलाला जन्म देऊ इच्छित आहे. तिची आई 35 वर्षांची असून तिने हे नाते देखील कबूल केले आहे.

इवानच्या आईला देखील वाटत आहे की तिचा मुलगा खरे बोलत आहे, तोच मुलाचा बाप आहे. परंतु त्याच्या आईला या गोष्टीची काळजी वाटते की मुलगा अजून लहान आहे आणि त्याला समजत नाही की नेमके काय झाले आहे.

डरियाने सांगितले की ती आणि तिचा बॉयफ्रेंड एकमेकांची चांगली काळजी घेतात दोघांनी सोशल मीडियावर मॅरीड देखील लिहिले आहे. मात्र या जोडीला लोकांच्या रागाचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –