Bacchu Kadu | बच्चू कडूंनी पुन्हा जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, मंत्रिपदाबाबत म्हणाले – अडीच वर्षानंतर होईन

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Bacchu Kadu | शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) विरोधकांनी केलेल्या चौफेर टीकेनंतर मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) केला. पण यानंतर मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिंदे गटातील (Shinde Group) अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी उफाळून येऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाराजांना लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करू असे आश्वासन देऊन झुलवत ठेवले आहे. यावर माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना प्रश्न विचारला असता त्यांची नाराजी स्पष्ट दिसून आली. बच्चू कडू म्हणाले, मी काय प्रमुख आहे का? आमचा प्रहार पक्ष शिंदे -भाजप सरकारमध्ये (Shinde-BJP Government) लहानसा पक्ष आहे, आता होईन नाहीतर अडीच वर्षानंतर मंत्री होईन.

अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या अतोनात नुकसान झाले आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी दोन वेळा आंदोलन करण्यात आले होते.
मात्र, याबाबत प्रश्न विचारला असता बच्चू कडू यांनी पत्रकारांवरच आगपाखड केली.

पत्रकारांनी शेतकर्‍यांच्या अनुदानासंदर्भात बच्चू कडू यांना विचारले असता, ते म्हणाले,
तुम्हाला दिसत नसेल तर माझ्याकडे चला, शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे दाखवतो, तुम्ही माहिती घेत नाही संशोधन केले पाहिजे पत्रकारांनी.
किती जणांच्या खात्यात पैसे आले ते तुम्हाला दाखवून देतो.
दोन दिवस अगोदरच शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

Web Title –Bacchu Kadu | after two and a half years as a minister bachu kadus answer revealed his displeasure once again

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा