Bacchu Kadu | रवी राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत मी 50 खोके घेतल्याचे पुरावे नाही दिले, तर आम्ही… – बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील कटुता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. दोघे एकमेकावर आरोप आणि कुरघोड्या करत असतात. यात आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही भाजपचे पाठीराखे आहेत. आता बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी त्यांच्यावर राणांनी केलेल्या आरोपांचे पुरावे देण्याचे आव्हान केले आहे. अन्यथा आपण मोठा निर्णय घेऊ, असे कडू म्हणाले.

 

बच्चू कडू हे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांपैकी आहेत. त्यामुळे त्यांनी 50 खोके घेतले आहेत, असा आरोप आणि दावा रवी राणा यांनी केला होता. त्यावर बच्चू कडू फार दुखावले आहेत. आता त्यांनी रवी राणा यांना मैदानात खेचत आव्हान केले आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत रवी राणा यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे सादर करावेत, नाहीतर मी योग्य तो निर्णय घेणार आहे. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचे यावेळी कडूंनी (Bacchu Kadu) सांगितले.

 

बुधवारी बच्चू कडू यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जनतेसमोर येऊन स्पष्टता करण्याचे आवाहन केले आहे.
50 खोक्यांचा आरोप आमच्यावर विरोधकांकडून होत आहे. ते आम्ही सहन केले.
पण, आता आमच्यासोबत सत्तेत असलेले आमदाराच आमच्यावर आरोप करु लागले, तर त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात आहे.
राणांच्या विधानामुळे शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदार देखील दुखावले आहेत.
आम्ही आठ ते दहा आमदार बसून प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहोत.
1 नोव्हेंबर पर्यंत राणांनी माफी मागतली नाही किंवा त्यांनी संबंधित आरोपांचे पुरावे दिले नाहीत,
तर आम्ही वेगळा निर्णय घेणार आहोत, असे कडू म्हणाले.

मी स्वबळावर चार वेळा आमदार झालो. राणांना चार पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागतो.
त्यामुळे आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला आहे. मला खोटे आरोप करुन शांत करायचे.
माझ्या विरोधात राज्य आणि केंद्र सरकारची मदत घेऊन षडयंत्र आखायचे काम राणा करत आहेत.
माझ्याकडे त्यासंबंधी एक व्हिडिओ क्लीप आहे. येत्या चार दिवसांत मी ती उघड करणार आहे, असे देखील कडू म्हणाले.

 

Web Title :- Bacchu Kadu | Bacchu Kadu challenge to ravi rana is to provide proof of the accusation of taking the money at guwahati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ameya Khopkar | हिंदूंचे सण हिंदुस्थानात नाहीतर काय पाकिस्तानात जाऊन साजरे करायचे का? – अमेय खोपकर

NCP MLA Nilesh Lanke| राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Kishori Pednekar | उद्धव ठाकरे उशिरा का होईना दौऱ्यावर गेले, किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना टोला