Bacchu Kadu | बच्चु कडू यांचा ‘मविआ’ सरकारला घरचा आहेर; म्हणाले – ‘सरकारनं एक तरी पारदर्शक काम करावं’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Bacchu Kadu | प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे शाळेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू (Bacchu Kadu) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) घरचा आहेर दिला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा (Health department exams) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, राज्य सरकारने किमान हे एक तरी पारदर्शक काम करावे अशा शब्दात बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. यानंतर बच्चू कडू यांनी देखील सरकारवर बोट ठेवले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारनं किमान एक तरी पारदर्शक काम करावं, अशा शब्दात प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोन वेळा घोळ होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरीही न्यासा कंपनीला पुन्हा परीक्षेचं काम दिल्याची खंत आहे. ज्या कंपनीने घोळ केला तरी त्यांना काम द्यायचं कारण काय? असा प्रश्न देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मागील वेळी परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही गोंधळ उडाला आहे.
परीक्षा पुढे ढकलूनही नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात येत आहे.
यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Web Title :- bacchu kadu | bacchu kadu slams mahavikas aghadi government over confusion in health department exams in amravati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Ashok Pawar | राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी (व्हिडिओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 84 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Shivaji University Recruitment 2021 | कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात लवकरच ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या