Bacchu Kadu | बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार का ? दीपक केसरकर म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bacchu Kadu | शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला असला तरी शिंदे गटातील अनेक आमदारांना मंदीपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. काल प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कडू यांच्या नाराजीवर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे. (Bacchu Kadu)

 

शिंदे सरकारमध्ये सामाजिक न्याय, अपंग कल्याण आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद मिळावे अशी बच्चू कडू यांची अपेक्षा होती. परंतु, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने कडू नाराज झाले आहेत. यावर स्पष्टीकरण देताना दीपक केसरकर म्हणाले, बच्चू कडू आमचे जवळचे नेते आहे. आमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा योग्य तो मान महाराष्ट्रात ठेवला जाईल. लवकरच आम्ही सर्वजण जाऊन त्यांची भेट घेऊ. त्यांना अतिशय चांगले खाते हे विस्तारानंतर मिळालेले तुम्हाला दिसेल. (Bacchu Kadu)

 

काल पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली. ते म्हणाले की, शिंदेंनी मंत्रिपद देण्याचे आम्हाला आश्वासन दिले होते. मंत्री बनवितो म्हणालेले, तर बनवायला हवे होते. परंतू पहिल्या विस्तारात मिळाले नाही. पहिल्या नाही निदान शेवटच्या तरी देतील. नाही दिले तर विचार करू, असे म्हणत कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निर्वाणीचा इशारा दिला होता.

 

त्यांनी पुढे म्हटले की, नाराजी आहे, पण एवढीही नाही की दुसरीकडे जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे.
सर्वच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर वेगळी गोष्ट असती. काही मुद्द्यांना घेऊन आम्ही शिदेंना पाठिंबा दिला होता.
त्यांनी काही सांगितलेले म्हणून आम्ही मागितले. हे राजकारण आहे. यात दोन आणि दोन चार होत नाही, शून्यही होऊ शकतो.
अडीच वर्षांनीदेखील मंत्रिमडळ विस्तार होऊ शकतो. काहीही सांगू शकत नाही, अशी शक्यता सुद्धा कडू यांनी व्यक्त केली.

 

Web Title : –  Bacchu Kadu | deepak kesarkar reaction over bacchu kadu cabinet expansion cm eknath shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा