Bacchu Kadu | मंत्र्यांच्या चालकांना 40 ते 45 हजार पगार मग एसटी कर्मचाऱ्यांना का नको? – बच्चू कडू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Bacchu Kadu | एका कार्यक्रमानिमित्त राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधत महावितरणकडून (msedcl) सुरु असलेल्या कृषी पंपांच्या वीज तोडणीवर नाराजी व्यक्त केली. तसेच महिनाभरापासून संपावर असलेल्या एसटी कामगारांच्या मागण्यांनाही त्यांनी पाठिंबा दर्शवला.

 

बच्चू कडू म्हणाले, कोरोना काळात वीजबिले थकली. त्याची वसुली महावितरणकडून सुरु झाले. थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे. विशेष करून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची कनेक्शनने तोडण्याची कारवाई केली जात आहे. थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करणे योग्य नाही. शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज दिली जाते, तर मग वीज बिलात ५० टक्के सवलत का मिळू नये? असा प्रश्न करत यासंदर्भात लवकरच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. महिनाभरापासून संपावर असलेल्या एसटी कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत कर्मचाऱयांनी कामावर हजर राहावे असे आवाहन कडू (Bacchu Kadu) यांनी केले. जिल्हाधिकारी, मंत्री यांच्या गाडीवरील चालकाला ४० ते ४५ हजार रुपये पगार मिळतो, तर मग शेकडो कष्टकऱ्यांच्या प्रवासाची सोय करणाऱ्या एसटी चालकालाही चांगला पगार मिळाला पाहिजे. असेही ते म्हणाले.

बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोदी सरकारने (Modi Government) कृषी कायदे रद्द (Farm Laws) करण्याचा निर्णय घेतला त्यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारला कृषी धोरण समजत नाही, त्यामुळे देशात कृषी मालाचे दर स्थिर नसतात. केंद्राचे कृषी बदलण्याची आवश्यकता आहे. संस्थाचालकांच्या बाजूचे सध्याचे शिक्षण कायदे आहेत. त्यात बदल करण्याची खूप आवश्यकता आहे. या कायद्यात बदल करून ते पालकांच्या बाजूचे करावेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Web Title :- Bacchu Kadu | farmers should get concession in electricity bills says minister bacchu kadu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bigg Boss 15 | व्हिआयपी रितेशचे पत्नी राखी सावंतसोबत झाले भांडण, म्हणाला – ‘तुझ्यापेक्षा शंभर टक्के…’

Nawab Malik | फडणवीसांच्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवर नवाब मलिकांचा हल्लाबोल; म्हणाले…

Devendra Fadnavis | पहाटेचा शपथविधी, ‘बेईमानी’ अन् ‘पश्चाताप’ ! संपूर्ण घटनाक्रमाचा होणार उलगडा; फडणवीसांचे पुस्तक लवकरच होणार प्रसिद्ध

Aishwarya Sharma-Neil Bhatt Wedding | लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा

Travel Insurance | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत ! प्रवास करणे असेल आवश्यक तर काढा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, जाणून घ्या कसा होईल फायदा