‘नाथाभाऊंच्या जाण्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजप ‘अनाथ’ होणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुलगी रोहणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेही उपस्थित होते. मुंबईतील राष्ट्रवादी प्रवेश कार्यालयात शुक्रवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. यांनतर आता बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिय दिली आहे.

बच्चू कडू (Omprakash Babarao Kadu) म्हणाले की, “नाथाभाऊंच्या जाण्यानं उत्तर महाराष्ट्रात भाजप अनाथ होणार आणि राष्ट्रवादीला नाथ मिळाल्यानं त्यांना चांगले दिवस येतील” असं म्हणत बच्चू कडू यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल एकनाथ खडसे यांना शुभेछाही दिल्या आहेत.

नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशांनतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही त्यांचं स्वागत केलं आहे. आणि पक्षाला नवं बळ मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले, “राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचं मी राष्ट्रवादी पक्षात मनापासून स्वागत करतो. मा. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवं बळ आणि ऊर्जा मिळाली आहे.” असंही त्यांनी सांगितलं आहे.