‘मातोश्री’ बाहेर शेतकर्‍याची भेट नाकारली, राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा ‘अहेर’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी आणि त्याच्या आठ वर्षाच्या मुलीला पोलिसांनी मातोश्री बाहेर ताब्यात घेतले. यावर नवनिर्वाचीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे. सामान्य नागरिक असो की शेतकरी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली पाहिजे असे म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. प्रशासनाकडून झालेली चूक दुरुस्त करणे गरजेचे आहे. असा काळ आला तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

खात कोणतही असो, मी त्यासाठी मागणी केली नव्हती. मात्र, सामाजिक न्याय मिळालं असत तर अपंग बांधवांना न्याय देता आला असता. सामाजिक न्याय खात्याची तशी मागणी कोण करत नाही. मात्र, आम्ही ते मागितले होते. त्या माध्यमातून अपंगांचे प्रश्न मार्गी लावता आले असते, असे बच्चू कडू यांनी खातेवाटपावर आपली प्रतिक्रिया दिली.

मातोश्रीवरून आला आदेश
पनवेल येथील शेतकरी देशमुख हे आपल्या आठ वर्षाच्या मुलीसह मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना आत सोडले नाही. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन खेरवाडी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. हा प्रकार प्रसारमाध्यमांनी दाखवल्यानंतर मातोश्रीवरून पोलिसांना त्या शेतकऱ्यांना सोडून देण्याचे आदेश देण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/