‘बच्चन’ कुटुंबाची दिवाळी पार्टी रद्द ! अभिषेकनं खुलासा करत सांगितलं कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बच्चन कुटुंब दरवर्षी दिवाळीची ग्रँड पार्टी देतं. या पार्टीत संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित असतं. श्वेता बच्चन (Shweta Bachchan-Nanda) ही देखील दिल्लीवरून खास पार्टीचं सेलिब्रेशन करायला मुंबईला येत असते. परंतु अशी माहिती मिळत आहे की, यंदा दिवाळी पार्टीचं आयोजन केलं जाणार नाही.

का रद्द झाली पार्टी ?

दिवाळी पार्टीबद्दल अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यानं स्वत: खुलासा केला आहे. अभिषेक म्हणाला की, “माझ्या बहिणीच्या सासूचं अर्थात रितु नंदा यांचं याच वर्षी निधन झालं. आणि आताची परिस्थिती पाहता कोणालाही पार्टीचा उत्साह नाही. त्यामुळं यंदा आमच्या घरी होणारी दिवाळी पार्टी रद्द करण्यात आली आहे. दिवाळीच्या उत्साहात फिजिकल डिस्टेंसिंग (Physical Distancing) आणि कोरोनाचे (COVID-19) सगळे नियम पाळा” असं आवाहनही अभिषेकनं चाहत्यांना केलं आहे.

कोरोनाबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला, “कोरोना कोणाला, कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही. जर पार्टीला लोक जमले आणि त्यांच्यामुळं कोरोना झाला तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळं सर्वांनीच खबरदारी घ्यायला हवी असंही अभिषेक यावेळी बोलताना म्हणाला.

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो लूडो, द बिग बुल आणि बॉब बिस्वास अशा काही सिनेमातही तो कम करताना दिसणार आहे. यापैकी बॉब बिस्वास या सिनेमाची शुटींग त्यानं सुरू केली होती. परंतु लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प झालं होतं.