अबब ! बच्चन कुटुंबाकडे TOP च्या लक्झरी गाड्यांचा ताफा, किंमत ऐकून उडेल ‘भंबेरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अमिताभ बच्चन जे बॉलिवूडचे महानायक आहेत ज्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती अभिनय क्षेत्रात आहे. बिग बी असो की ऐश्वर्या, अभिषेक बच्चन अनेकांना नवनवीन गोष्टींची खास आवड आहे. अमिताभ बच्चन यांना गाड्यांची फार आवड आहे. बच्चन कुटुंबाच्या पार्किंगमध्ये अनेक महागड्या गाड्यांची रांग लागलेली असते. अमिताभदेखील नवनवीन गाड्या खरेदी करतच असतात. पण त्या गाड्या काही साध्यासुध्या नाहीयेत, तर कोट्यवधींच्या आहेत. तर फक्त बिग बीच नाही तर अभिषेक बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि छोटी आराध्यादेखील या गाड्यांमधून फिरायला जाण्याची संधी सोडत नाही.

अमिताभ यांच्याकडे लॅन्ड रोव्हर रेन्ज रोव्हर वोगचं सगळ्यात टॉप मॉडेल आहे. ज्याची किंमत २ कोटी ८० लाख आहे. याशिवाय त्यांच्याकडे सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी ऑडी गाडीदेखील आहे. ही अभिषेकची सगळ्यात आवडती गाडी आहे, या गाडीची किंमत जवळपास १ कोटी १४ लाख आहे. बिग बींच्या घरात मिनी कूपर सगळ्यात स्वस्त गाडी आहे. अभिषेकने अमिताभ यांना त्यांच्या वाढदिवसाला भेट दिली होती. तर दुसरीकडे त्यांच्या महागड्या गाड्यांची शोभा वाढवणारी सगळ्यात महाग गाडी म्हणजे पांढऱ्या रंगाची बेंटली कॉन्टिनेटल आहे. या गाडीची किंमत ३ कोटी ९२ लाख रुपये आहे.

आपल्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये भर म्हणून २०२० मध्ये अमिताभ यांनी मर्सिडीज बेन्ज एस क्लास विकत घेतली होती. या गाडीची किंमत जवळपास १ कोटी ३८ लाख रुपये आहे. अमिताभ यांच्याकडे मर्सिडीज बेन्ज एस क्लास सोबतच मर्सिडीज बेन्ज व्ही क्लासदेखील आहे. ही गाडी त्यांनी २०१९ मध्ये विकत घेतली होती. या गाडीची किंमत साधारणपणे ८१ लाख ९० हजार आहे. बिग बी यांच्या घराची शान असलेली एसयूवी लेक्सस एलएक्स ५७० गाडी त्यांनी ७६ व्या वाढदिवसादिवशी घेतली होती. या गाडीची किंमत २ कोटी ३३ लाख रुपये असून या गाडीबद्दल ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माहिती दिली होती.