Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांचा वाद मागील काही दिवसात चिघळला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैठक घेत दोघांची समजूत काढली होती. पण, आता पुन्हा एकदा हा वाद वर आला आहे. अमरावती येथे प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. त्यामुळे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचे ‘मै झुकेगा नही’ अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू (Bachchu Kadu) हे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांपैकी आहेत. त्यामुळे त्यांनी 50 कोटी घेतले आहेत. असे आरोप रवी राणा यांनी केले होते. तसेच बच्चू कडू तोडपाणी करतात, मांडवली करतात आणि पैसे घेऊन पाठिंबा देतात, असे देखील राणा म्हणाले होते. त्यावर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी रवी राणा यांना पैसे घेतल्याचे पुराव सादर करण्यास सांगितले होते. तसेच यावेळी 1 नोव्हेंबरपर्यंत राणांनी पुरावे सादर केले नाहीत, तर आपण वेगळी भूमिका घेणार असल्याचे देखील कडू बोलले होते.

त्यावर शिंदे आणि भाजपच्या (BJP) आमदारांनी ह्या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांची समजूत
काढतील, म्हटले होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांची बैठक घेतली आणि दोघांना देखील
समजुतीने घेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्याकडून सरकार आणि संघटना धोक्यात येईल, असे वर्तन आणि भाष्य
न करण्याचे सांगितले. दोघांमध्ये गैरसमजुतीने वाद पेटला होता. तसेच दोघेजण रागाच्या भरात असल्याने एकमेकांवर आरोप करत होते, असे फडणवीस म्हणाले.

Web Title :- Bachchu Kadu | a meeting of bachu kadus prahar organization in amravati will leave the government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup 2022 | ‘या’ दिग्गजांचा हा शेवटचा T20 विश्वचषक असेल, टीम इंडियामध्ये बदलाला सुरुवात

Siddharth Chandekar | अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं ‘माझे स्वेटशर्ट्स चोरू नकोस’ अशी वॉर्निंग देत केली पोस्ट शेअर

Pune Traffic News | धायरी भागात जड वाहनांना बंदी