Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

0
307
Bachchu Kadu | bacchu kadu statement on political instability in maharashtra after eknath shinde revolt
File Photo

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी जो राजकीय उठाव केला त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता वाढली, असे मत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कमालीची राजकीय अस्थिरता दिसते. याबाबत आमदार बच्चू कडू यांना विचारले असता. त्यावर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी हे मत व्यक्त केले.

 

 

गेल्या काही दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, ‘राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि शिंदे गट (Shinde Group) अशा दोन्हींकडे आहे. सत्ताधाऱ्यांसाठी न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुळात या सगळ्याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यात लवकर राजकीय स्थिरता यावी अशी आमची इच्छा आहे.’ असे मत बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना विचारले असता, एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ‘धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. ही सुनावणी पार पडली की मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.’ असे यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले.

 

तर, काल परभणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेकडून दिव्यांग मंत्रालयाची
मागणी करण्यात आली असून येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रीपद मिळेल.
असे देखील त्यांनी ठामपणे सांगितले.

 

Web Title :- Bachchu Kadu | bacchu kadu statement on political instability in maharashtra after eknath shinde revolt

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा