माजी आमदार अशोक पवार यांच्या आंदोलनास आमदार बच्चू कडू यांचा पाठिंबा

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या उद्या दि.५जून रोजी शिरुर तहसील कार्यालय येथे होणाऱ्या आमरण उपोषणाला आमदार बच्चू कडू यांनी जाहीर पाठिंबा दिला असून या बाबत जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देऊन या आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा माजी आमदार अशोक पवार यांच्या बरोबर सहभागी होणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांना आमदार बच्चू कडू यांनी माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्रानुसार निवेदन दिले आहे.

त्यानुसार जलसंपदा विभागाने पाणी वाटपाचे प्राधान्यक्रम ठरविले आहे. पाणी वापराचा सुधारित प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे आहे . पशुधनासह पिण्यासाठी पाणी तसेच शीतकरण आरोग्य आणि स्वच्छता विषयक गरजा यासाठी घरगुती वापर.कृषी सिंचनाकरीता (पाणी वापर ) औद्योगिक ,वाणिज्यिक वापर व कृषी उत्पादनावर आधारित उद्योगासाठी वापर.पर्यावरण व करमणूक यासाठी वापर, व इतर सर्व प्रकारच्या वापरासाठी असे प्राधान्यक्रम आहेत. याबाबत शासनाने ठोस पावले उचललेले दिसुन येत नाही. तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या पाणी पुुरवठा व वाटपा बाबतीत खुलासा देण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.

शासन निर्णयानुसार प्राधान्यक्रमाने रांजणगाव एम.आय.डी.सी.ला व त्यावर अवलंबित असणा-या पिण्यासाठीच्या पाणी पुरवठा योजनेचा वापर सोडून औद्योगिक कारणासाठी पाणी बंद करण्यात यावे .
अन्यथा माजी आमदार अशोक पवार यांच्या बरोबर आंंदोलन करण्याचा इशारा आमदार
बच्चू कडू यांनी दिला आहे.