Bachchu Kadu | बच्चू कडू यांनी बोलून दाखवली पंकजा मुंडेंसोबत युतीची इच्छा; राज्यात नवे राजकीय समीकरण?

पोलीसनामा ऑनलाइन – Bachchu Kadu | महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणांमध्ये मागील काही वर्षांपासून अनेक बदल झाले आहेत. अनेक वर्षे एकमेकांना प्रचंड विरोध करणाऱ्या पक्षांनी हातात हात घेत सत्ता स्थापित केली आहे. आता राज्यात काही नवीन समीकरणे बनण्याची चिन्हे पुन्हा एकदा दिसून येत आहेत. प्रहारचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासोबत युती करण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले आहे. पंकजा मुंडे यांच्यामध्ये क्षमता आहे. पंकजा मुंडे यांचे स्वत:चे दहा-पंधरा आमदार असतील, तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करू असे विधान बच्चू कडू (Bachchu Kadu And Pankaja Munde) यांनी केले आहे.

भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे या त्यांच्या ‘शिवशक्ती परिक्रमा’ (Shivshakti Parikrama) यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या या आठवडाभर चालणाऱ्या परिक्रमेमुळे अनेक राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या असून पंकजा यांच्या पुढच्या राजकीय खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान माजी मंत्री बच्चू कडू यांनी पंकजा मुंडेंसोबत युती करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. बच्चू कडू यांना पंकजा मुंडे यांच्या परिक्रमेबद्दल विचारले असते त्यांनी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे.

बच्चू कडू म्हणाले की, “पंकजा मुंडे यांच्यामध्ये क्षमता आहे, यात मला शंका आहे. आमच्यात सुद्धा क्षमता आहे. आम्ही मेहनत करतो. आम्ही गावा गावात जातो, जिल्ह्यात जातो, माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. जेवढं लढायचं तेवढं लढतोय, जेवढं काम करायचं तेवढं करतोय.” त्यामुळे पंकजा मुंडेंसोबत आम्ही युती करु असे कडू म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, “आमच्यात क्षमता नसताना, आमचा बापदादा राजकारणात नसताना सुद्धा कामातून,
सेवेतून उभं केलेलं वलय आहे. आम्ही कुणाला जातीबद्दल सांगितलं नाही. सेवा हा आमचा पहिला धर्म आहे.
सेवेशिवाय आम्हाला काही समजत नाही. पंकजा मुंडे यांच्यात क्षमता आहे. त्यांनी ती तपासली पाहिजे.
त्यांचे स्वत:चे दहा-पंधरा आमदार असतील, तर हरकत नाही. आम्हीही त्यांच्याबरोबर युती करू,” अशा शब्दांमध्ये माजी मंत्री बच्चू कडू यांनी नव्या युतीची शक्यता व्यक्त केली आहे. बच्चू कडूंचे हे विधान सर्वत्र गाजत असून आता राजकारणामध्ये नवे समीकरण दिसून येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘शिवशक्ती परिक्रमा’ हा दौरा कालपासून (दि.04) सुरु केला आहे.
पुढचे आठ दिवस त्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या दौऱ्याच्या माध्यमातून भेटी देणार आहेत.
त्यांच्या दौऱ्याची सुरुवात औरंगाबाद येथील संत भगवानबाबा मंदिरामध्ये (Sant Bhagwan Baba Mandir) दर्शन
घेऊन करण्यात आली आहे. 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या ‘शिवशक्ती परिक्रमे’मध्ये पंकजा मुंडे या
पाच हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. दरम्यान ज्योतिर्लिंग आणि शक्ती पीठांचे दर्शन घेणार आहेत.
पहिल्याच दिवशी त्यांचा हा ‘शिवशक्ती परिक्रमा’ दौरा गाजला असून त्यानंतर माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu)
यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Supriya Sule | भोर आणि वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडवा