Bachchu Kadu | ‘राष्ट्रवादीची बॅनरबाजी एकप्रकारची मुर्खता’, बच्चू कडूंनी राष्ट्रवादीला सांगितला नियम

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आडनाववरुन केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांना सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द (Disqualification) करण्यात आले. यानंतर बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील (Nationalist Youth Congress Pune) पाषाण रोड परिसरात लावले होते. यावर लिहिले होते, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना सारखेच असतात, यावर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

राष्ट्रवादीची सत्ता जाते आणि भाजपाला फायदा होतो
बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, राष्ट्रवादीची (NCP) बॅनरबाजी ही एक प्रकारची मूर्खता आहे. हे त्यांनी अज्ञानातून केले आहे. या अज्ञानामुळे त्यांची सत्ता नेहमी जाते आणि भाजप (BJP) त्याचा फायदा घेते. मुळात मला जी शिक्षा सुनावली आहे ती दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आहे. त्यापैकी एक गुन्हा हा भांदवी कलम 504 अंतर्गत आहे, तर दुसरा भांदवी 353 या कलमांतर्गत आहे. एकाच गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर मी अपात्र ठरलो असतो. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा झाल्याने माझ्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही.

 

बच्चू कडू पुढे म्हणाले, मुळात नियम काय सांगतो तर एकाच गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा झाली असेल आणि
उच्च न्यायालयाने (High Court) त्याला स्थगिती दिली नाही तर उमेदवाराचं सदस्यत्व (खासदार, आमदार) रद्द होते.

 

Web Title :- Bachchu Kadu | ncp lost power due to stupidity says bachchu kadu

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश