
Bachchu Kadu On Pankaja Munde | पंकजा मुंडेंवर जीएसटी विभागाची कारवाई का झाली? – बच्चू कडू
मुंबई : Bachchu Kadu On Pankaja Munde | केंद्राचा जीएसएटी (GST) थकवल्याप्रकरणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील साखर कारखान्याची १९ कोटीची मालमत्ता जीएसटी विभागाने काल रविवारी जप्त केली. मोठ-मोठे घोटाळे केलेल्या राजकीय नेत्यांना पक्षात घेऊन अभय देत असलेल्या भाजपाने आपल्याच नेत्यावर कारवाई कशी केली? याबाबत राज्याच्या राजकारणात विविध अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी या कारवाईचे थेट कारण सांगितले. (Bachchu Kadu On Pankaja Munde)
केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाकडून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत अमरावतीमध्ये बोलताना प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असे मला वाटते. (Bachchu Kadu On Pankaja Munde)
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला पंकजा मुंडेंची यात्रा खटकली? केंद्रीय नेतृत्वाकडे पंकजा मुंडेंची तक्रार कुणी केली? तसेच कारवाई करण्याचे नक्की कारण यात्राच आहे की आणखी काही? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाचा १९ कोटीचा जीएसटी थकवल्याचा आरोप आहे. तत्पूर्वी जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यात कारखान्यावर छापेमारी केली होती.
त्यावेळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे उघड झाले होते.
केंद्रीय जीएसटी विभागाने शनिवारी पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस पाठवली आणि ताबडतोब रविवारी
जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा