‘कोरोना’च्या दहशतीमुळं बीअरकडे पाठ, विक्रीत विक्रमी 62 टक्क्यांची घट !

पोलीसनामा ऑनलाइनः कोरोनाच्या भीतीने अनेक तळीरामांनी बीअरकडे पाठ फिरवली आहे. कोरोनाकाळात बीअरची (Beer) विक्री तब्बल 62 टक्क्यांनी घटली आहे. हिंदुस्थान टाईम्स याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या महिन्यात बीअरची विक्री 62.5 टक्क्यांनी घटली आहे. कोरोना काळात थंड पेय टाळा हा सल्ला बीअर पिणा-यांनी मनावर घेतला होता. जानेवारीत दिवसाला 8 लाख लीटर बीअरची विक्री होत असत. ऑक्टोंबरमध्ये त्यात घट होऊन 3 लाख लिटरवर आली आहे.

याबाबत महसूल विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप म्हणाले, की कोरोना काळात थंडपेय पिण्याचा टाळा हा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे बीअरच्या विक्रीत घट झालेली दिसत आहे. मात्र, दारूच्या विक्रीत फार फरक पडला नाही. कोरोनापूर्वी दिवसाला 10 लाख लिटर दारू विकली जात असे. त्याचे प्रमाण 9 लाख लिटरवर आले आहे. व्हिस्की, व्होडका, रम याची दिवसाला 6 लाख लीटर विक्री झाली आहे. कोरोनापूर्वी दिवसाला शासनाला दारूच्या माध्यमातून सरासरी 38 ते 40 कोटी रुपये महसूल मिळत असे आता दिवसाला 35 कोटी महसूल मिळत आहे. लिकर शॉपमध्ये बीअरची सर्वाधिक विक्री होते. परंतू गेल्या सहा महिन्यांत बीअरची मागणी घटली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक ग्राहकांनी बीअर पिण्याचे टाळल्याची माहिती दारू विक्री संघाचे अध्यक्ष अरविंद मिस्किन यांनी दिली आहे.