Bacterial-Fungal Ear Infection | जाणून घ्या कानात होणारे इन्फेक्शन आणि ते रोखण्याचे उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bacterial-Fungal Ear Infection | बहुतेक लोक शरीराच्या इतर भागांप्रमाणे कानांची काळजी (Ear Care) घेत नाहीत, तर काही लोक नेहमी इअरबड्सने (Earbuds) कान स्वच्छ करत असतात, या दोन्ही स्थिती वाईट आहेत. साफसफाई न करणे आणि जास्त करणे यामुळे सुद्धा कानात (Bacterial-Fungal Ear Infection) अनेक समस्या निर्माण होतात.

 

आकडेवारीनुसार, भारतातील 23-25 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या कानाच्या समस्येने त्रस्त आहेत. ज्यामध्ये कानात दुखणे (Earache), ऐकू कमी येणे (Hearing Loss), एखाद्या प्रकारचा दाब जाणवणे, सूज येणे (Swelling), कान वाहणे आणि इन्फेक्शन (Infection) यांचा समावेश होतो. कानाच्या दोन प्रमुख इन्फेक्शन बाबत जाणून घेवूयात (Two Major Ear Infection)…

 

1. फंगल इन्फेक्शन (Fungal Infection)
फंगल इन्फेक्शनचे सर्वात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे ओलावा. फंगलच्या वाढीसाठी ओलसर आणि दमट ठिकाणे पोषक असतात. कानाचे इन्फेक्शन कानाच्या नलिकेच्या बाहेरच्या बाजूला होते. हे इन्फेक्शन Aspergillus आणि Candida नावाच्या जीवाणूंमुळे होते.

 

फंगल इन्फेक्शन रोखण्याचे उपाय (Tips to Prevent Fungal Infections)
कान नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा (Always Keep Yours Ears Clean And Dry). विशेषतः जर तुम्ही पोहायला गेल्यानंतर जास्त काळजी घ्या.

कानातील खाज इयरबड्सने शांत करण्याची चूक करू नका.

वेळोवेळी कान स्वच्छ करत रहा. त्यामुळे घाण जमत नाही, त्यामुळे खाज सुटण्याची आणि संसर्ग होण्याची शक्यता खुप कमी होते.

आंघोळ करताना किंवा केस धुताना कानात पाणी गेल्यास ते कोरड्या कपड्याने पुसून टाकावे.

हेडफोन (Headphones) किंवा ब्लूटूथ (Bluetooth), जे तुम्ही बोलण्यासाठी किंवा संगीत ऐकण्यासाठी वापरता ते स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.

2. बॅक्टेरियल इन्फेक्शन (Bacterial Infection)
कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन (Bacterial Infection) पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. पाऊस, थंडी किंवा वारा यामुळे घशाचा संसर्ग सर्वप्रथम होतो. घशाचा संसर्ग युस्टाचियन ट्यूबद्वारे (Eustachian Tube) पसरतो, ती नळी जी आपले कान आणि घसा यांना जोडते. या नळीद्वारे कानालाही संसर्ग होतो. (Bacterial-Fungal Ear Infection)

 

बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळण्यासाठी उपाय (Prevent Bacterial Infection)
– घशातून पसरणारा संसर्ग (Throat Infection) असल्याने घशाची कोणत्याही स्थितीत काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून ते कानापर्यंत पोहोचू नये.

– थंडी आणि पावसात जास्त थंड वस्तूंचे सेवन टाळा आणि तरीही घशात संसर्ग होत असेल तर गरम पदार्थांचे सेवन करून लवकरात लवकर बरे करण्याचा प्रयत्न करा.

– बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्यासाठी एक अतिशय प्रभावी मार्ग म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे.

 

 

Web Title :- Bacterial-Fungal Ear Infection | ways to prevent bacterial and fungal infections in the ear

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Paracetamol Usage | अल्कोहोल घेतल्यानंतर घेत असाल पॅरासिटामॉलची गोळी तर व्हा सावध ! ‘या’ अवयवाचे होऊ शकते सर्वात जास्त नुकसान

 

Nushrratt Bharuccha Monokini Photo | स्विमिंग पूलजवळ नुसरत भरूचानं दाखवला बोल्ड अंदाज, मोनोकिना घालून सोशल मीडियावर केला कहर…

 

Rupali Thombare Patil | शरद पवारांवरील टीकेनंतर रूपाली पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; बिरोबाला घातलं ‘हे’ साकडं !