‘बॅड बॉईज’च्या बॉलिवूड व्हर्जनसाठी शाहरूख खान दिग्दर्शकांची पहिली पसंत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोरक्को – बेल्जियमचे डायरेक्टर आदिल एल अरब आणि बिलाल फलाह यांचं बॉलिवूडवर प्रेम तर आहेच, शिवाय हिंदी सिनेमा बनवण्याचीही त्यांची इच्छा आहे. डायरेक्टरच्या या जोडीला वाटतं की, त्यांचा अलीकडेच रिलीज झालेला हिट हॉलिवूड सिनेमा बॅड बॉईज फॉर लाईफचं एक इंडियन व्हर्जन बनवणं एक चांगला विचार आहे. त्यांनी यासाठी स्टार म्हणून शाहरुख खानला पसंतही केलं आहे.

याच वर्षाच्या सुरुवातीला बॅड बॉईज फॉर लाईफ सिनेमाच्या रिलीजवेळीच डायेरक्टर रोहित शेट्टीनं या फ्रेंचायजीचा बॉलिवूड रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

आदिलला या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “हा सिनेमा बनणं ही सन्मानाची बाब असेल. कारण बॉलिवूड जगातील मोठ्या फिल्म उद्योगांपैकी एक आहे. आम्ही मोरक्कोचे आहोत जिथं बॉलिवूडचे मोठ्या संख्येत चाहते आहेत. यात जगभरात फेमस स्टार शाहरुख खानही आहे. म्हणून आशा आहे सिनेमात त्या रोलसाठी शाहरुख खान असेल.”

आदिल पुढे म्हणाला, “बॅड बॉईजमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बलिवूड सिनेमांसोबत मिळत्याजुळत्या आहेत. मला वाटतं की, यात जास्त म्युझिकचा वापर करावा लागेल.” बिलालनंही या व्हर्जनसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.

1995 साली मायकल कोप यांनी या सीरिजला सुरुवात केली होती. याचा दुसरा भाग 2003 मध्ये आणि तिसरा भाग या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला होता. बॅड बॉईजच्या चौथ्या भागावर काम सुरू आहे.