Bad Breath | श्वासाच्या दुर्गंधीने असाल त्रस्त, तर ‘या’ 4 पदार्थांपासून राहा दूर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – श्वास हा माणूस जीवंत असल्याचा पुरावा आहे. तर श्वासाची दुर्गंधी (Bad Breath) ही अंतर्गत अस्वच्छतेचा एक परिणाम आहे जी अनेक आरोग्य समस्यांमुळे (Health Problems) होऊ शकते. परंतु काही वेळा काही पदार्थ खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी (Bad Breath) येऊ शकते. श्वासाची दुर्गंधी केवळ तुमच्या खराब आरोग्याबद्दलच सांगत नाही तर तुमच्या जवळच्या लोकांना त्रासही देते.

 

आहारतज्ञ आणि फिटेलो फिटनेस अ‍ॅपचे सह-संस्थापक मॅक सिंग (Mac Singh, A Dietitian And Co-founder Of The Fitelo Fitness App) म्हणतात की श्वासाची दुर्गंधीला वैद्यकीय भाषेत हॅलिटोसिस (Halitosis) म्हणतात. दातांचे चांगले आरोग्य तुम्हाला ताजा श्वास घेण्यास मदत करू शकते. तोंड कोरडे पडणे, हिरड्यांचे आजार, सायनस आणि धुम्रपान (Dry Mouth, Gum Disease, Sinus And Smoking) यांसारख्या आरोग्याच्या अनेक कारणांमुळे श्वासाची दुर्गंधी येते.

 

दुर्गंधी येण्याचे कारण म्हणजे तोंडात दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया (Bacteria) असतात, जे दातांमध्ये निर्माण झाल्याने श्वासाला दुर्गंधी येते. कोणते पदार्थ सेवन केल्याने श्वासाची दुर्गंधी येते आणि त्यापासून मुक्त कसे व्हावे ते जाणून घेऊया (Let’s Know What Foods Cause Bad Breath And How To Get Rid Of It).

 

या पदार्थांमुळे येते श्वासाची दुर्गंधी (These Substances Cause Bad Breath)

1. लसूण आणि कांदा यामुळे श्वासाला येते दुर्गंधी (Garlic And Onion Cause Bad Breath) :
आहारात लसूण (Garlic) आणि कांदा (Onion) खाल्ल्याने तोंडाला दुर्गंधी येते. कांदा आणि लसूणमध्ये सल्फरचे प्रमाण (Sulfur Level) जास्त असते, जे सेवन केल्यानंतर लगेच श्वासावर परिणाम होतो. सल्फर शरीरातील रक्तप्रवाहात शोषले जाते आणि श्वास सोडताना ते शरीरातून बाहेर पडते, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी येते.

2. चीज खाल्ल्यानंतर येतो तोंडाला वास (Odor Comes After Eating Cheese) :
चीज (Cheese) हे अमीनो अ‍ॅसिडयुक्त (Amino Acid) अन्न आहे. ते सल्फर संयुग तयार करण्यासाठी तोंडात नैसर्गिकरित्या आढणार्‍या जीवाणूंसोबत मिळते आणि हायड्रोजन सल्फाइड तयार करते. हायड्रोजन सल्फाईटमुळे तोंडात दुर्गंधी येते.

 

3. कॉफी आणि अल्कोहोलच्या सेवनाने येते श्वासाला दुर्गंधी (Consumption Of Coffee And Alcohol Causes Bad Breath) :
कॉफी आणि अल्कोहोल सारखी पेये तोंड डिहायड्रेट (Dehydrate) करतात, ज्यामुळे दुर्गंधीयुक्त जीवाणू आणि श्वासाची दुर्गंधी वाढते.

सिंग म्हणतात की, असे काही पदार्थ आणि पेये आहेत जे श्वासाची दुर्गंधी दूर ठेवण्यास मदत करू शकतात. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात…

 

श्वासाची दुर्गंधी दूर करणारे पदार्थ (Foods That Relieve Bad Breath)

1. ग्रीन टी (Green Tea) :
अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी (Anti-oxidant Properties) समृद्ध, ग्रीन टी श्वासाच्या दुर्गंधीशी लढण्यासाठी प्रभावी आहे. याचे सेवन केल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते.

 

2. पुदिन्याच्या पानांचे सेवन करा (Eat Mint Leaves) :
श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी, औषधी गुणधर्मांनी (Medicinal Properties) युक्त पुदिन्याच्या पानांचे सेवन करा. तुम्ही पुदिन्याची पाने सलाड, पराठे, गार्निश आणि इतर अनेक पदार्थांमध्ये घालून वापरू शकता.

 

3. लवंगाचे सेवन करा (Eat Cloves) :
लवंग बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा मसाला आहे जो श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्त करतो आणि त्वरित ताजा श्वास देतो.

 

4. हेल्दी डेंटल रूटीन (Healthy Dental Routine) :
तुम्ही श्वासाच्या दुर्गंधीने त्रस्त असाल तर हेल्दी डेंटल रूटीनचे पालन करा. दिवसातून दोनदा दात घासून माऊथवॉश वापरा. श्वासाची दुर्गंधी ही कॅव्हिटी (Cavity), हिरड्यांचे आजार किंवा गंभीर अंतर्गत समस्येचे लक्षण देखील असू शकते.

 

आहारात बदल करून आणि हेल्दी डेंटल रूटीन अवलंबून देखील श्वासाची दुर्गंधी जात नसेल तर दंतवैद्याकडे जा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Bad Breath | certain foods that can increase bad breath know how to get rid of bad breath

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Juices For Kidney Stones | किडनी स्टोनच्या समस्येत उपयोगी आहेत ‘हे’ 3 ज्यूस, आजपासूनच डाएटमध्ये करा समावेश

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

 

Fenugreek Seeds Health Benefits | मेथीच्या दाण्यांचे आश्चर्यकारक फायदे, हृदय आणि मधुमेहासाठी वरदान; जाणून घ्या