किडनी खराब व्हायला ’या’ 6 सवयी ठरतात कारणीभूत, वेळीच व्हा सावध

किडनी (kidney ) हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी(kidney )चे आरोग्य बिघडल्यास शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. हृदयाला रक्तप्रवाह होण्याआधी किडनीमधून ते फिल्टर होतं. किडनी मुत्राच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्सना बाहेर टाकते. हे महत्वाचे कार्य करणारी किडनी खराब झाली तर त्याचा परिणाम एकुणच शरीरावर होत असतो, यासाठी योग्य ती काळजी घेणे खुप गरजेचे असते. काही चूकीच्या सवयींमुळे किडनी खराब होण्याचा धोका असतो या सवयी कोणत्या ते जाणून घेवूयात.

या सवयींपासून दूर राहा

1 अति मद्यसेवन करणार्‍यांची किडनी खराब होऊ शकते. यामुळे शरीरात विषारी घटक वाढतात आणि ती खराब होते.

2 तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करणार्‍यांना हा धोका जास्त असतो. यामुळे मुत्राशयाशी संबंधित आजार होऊ शकतात. यासाठी काम करताना अधूनमधून ब्रेक घ्या.

3 मीठ आणि साखरेचं जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो. शरीरात सोडीयमचं प्रमाण जास्त होऊन किडनीची समस्या होऊ शकते.

4 झोप चांगली झाली नाही, तर शारीरिक संतुलन बिघडून अनेक समस्या होऊ शकतात.

5 सतत पेनकिलर घेतल्याने संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होतातत. किडनीवर सुद्धा परिणाम होऊन रक्तप्रवाह बाधित होतो.

6 दिवसभरात कमी पाणी प्यायल्याने सुद्धा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. किडनी स्टोनसारख्या समस्या निर्माण होतात. यासाठी रोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.