पाथरी-सोनपेठ रस्त्याची दुरावस्था ! रस्त्यातील खड्ड्यात खताची वाहतूक करणारा ट्रक फसला

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील पाथरी सोनपेठ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे हे अपघाताचे कारण ओढवू शकतात. संबंधित अभियंत्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहनचालकांचे हाल होत आहेत. पाथरी सोनपेठ रोडवरील पाथरीकडे जाताना बाभळगाव फाट्याच्या पुढे रस्त्यावर एक मोठा खड्डा तयार झाला आहे.

यापूर्वी रस्त्यावर धावणारी अवजड वाहने खड्ड्यात फसली आहेत. वेळीच खड्ड्यात भराव टाकून ये जा करण्यासाठी रस्ता सुरळीत करणे गरजेचे आहे. यापूर्वीच परभणी येथून सोनपेठ ला शासकीय धान्य घेऊन जाणारा ट्रक फसला होता. रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित अभियंत्याचे स्पष्ट दुर्लक्ष दिसून येत आहे. परळी येथून मानवत ला खताची ला घेऊन जाणारा ट्रक काल दुपारी शनिवारपासून जागच्याजागी बसून बसला आहे.

रस्त्यावरील खड्ड्यातून निर्माण होणाऱ्या समस्या कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. जागोजागी पडलेले रस्त्यातील खड्डे हे अपघाती ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाथरी सोनपेठ रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहनधारकांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी पुढे येऊ लागली आहे.