जंक फूड खाणाऱ्यांनो सावधान ! डोळ्याने दिसणे कमी होऊ शकते

पोलीसनामा ऑनलाईन टीम – माणसाचे जीवन आजकाल अतिशय धावपळीचे होत चालले आहे. लोकांकडे व्यवस्थित जेवण करण्यासाठी सुद्धा वेळ राहिला नाही. अशा परिस्थितीत जंक फूड खाण्याचे प्रमाण मात्र वाढत चालले आहे. मग त्यामुळेच लठ्ठपणा आणि अनेक जीवघेणे आजार होत आहेत. आपल्याला कदाचित हे माहित नसेल की, जंक फूड खाल्ल्यामुळे आपल्या डोळ्यांने दिसण्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते. अशीच एक केस इंग्लंड या देशामध्ये समोर आली आहे.

डोळ्याने दिसणे होऊ शकते बंद
केसमधील अहवालानुसार, इंग्लंड मधील लंडन शहरामध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षाच्या मुलाला डोळ्याने दिसणे बंद झाले आहे. याचे कारण जंक फूड असल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच त्याची ऐकण्याची शक्ती सुद्धा कमी झाली आहे. अहवालामध्ये सांगितले आहे की, हा मुलगा मागच्या १० वर्षांपासून फक्त जंक फूड खात होता. तो केवळ बर्गर, चिप्स, पिझ्झा, सॉस, प्रोसेस्ड मीट सारखे पदार्थ दररोज जेवणात खात होता. त्यामुळे याच्या डोळ्याने दिसणे बंद झाले आहे. तसं इंग्लंडमध्ये घडेलेला हा पहिलाच प्रकार आहे. याच्या आधी असा प्रकार घडल्याचे समोर आले नव्हते.

बाधित मुलाचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, या मुलाला रेअर ईटिंग डिसऑर्डर आहे. मेडिकल सायन्स मध्ये याला अवॉइडेंट-रेसट्रिकटिव फूड इनटेक डिसऑर्डर म्हटले जाते. बाधित मुलाला हा आजार शाळेला असताना पासूनच आहे. त्यामुळेच त्याला भाज्या आणि फळं खायला आवडत नाहीत. या मुलाला केवळ जंक फूडच खायला आवडतात.

शरीरातील व्हिटॅमिनचे प्रमाण कमी होते
आपल्या माहितीसाठी, बाधित मुलाला असलेल्या रेअर ईटिंग डिसऑर्डर मुळे त्याच्या शरीरातील विटामिन कमी झाले होते. या कारणामुळे पुढे जाऊन त्याच्या शरीरात कमी न्यूट्रिशनल ऑप्टिक न्यूरोपॅथी मध्ये परिवर्तित झाली. तसं हा आजार विकसनशील देशातील मुलांमध्ये दिसून येतो. कारण की, मुलांना जेवणातून सर्व पोषणतत्त्वे मिळत नाहीत. परंतु, पश्चिमी देशांमध्ये न्यूरोपॅथी होणे जरा चकितच करणारे आहे. त्यामुळे जंक फूड खाण्याचे टाळले पाहिजे अन्यथा डोळ्यांने दिसणे कमी होऊ शकते.